शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांनी सामाजिक बांधणीतही सहभागी व्हावे : नंदकुमार वडनेरे; पुण्यात सेवावृतींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 14:59 IST

सेवानिवृत्त झाल्यावर अभियंत्यांनी पायाभूत सुविधांप्रमाणे सामाजिक बांधणीतही योगदान द्यायला हवे’, असे प्रतिपादन राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांनी केले.

ठळक मुद्देविविध क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणाऱ्या ११ सेवावृत्तीचा सत्कारनिवृत्तीनंतर कुटुंबाला वेळ देतानाच सामाजिक कार्यातही सहभाग घ्यावा : वडनेरे

पुणे : ‘पायाभूत सुविधांच्या बांधणीत अभियंत्याचे योगदान मोलाचे असते. अभियंते देशाच्या विकासात भरीव योगदान देत असतात. सेवानिवृत्त झाल्यावर अभियंत्यांनी पायाभूत सुविधांप्रमाणे सामाजिक बांधणीतही योगदान द्यायला हवे’, असे प्रतिपादन राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांनी केले.असोसिएशन आॅफ कर्नाटक इंजिनीअर्स रिटायर्ड फ्रॉम महाराष्ट्र सर्व्हिस (कर्नाटक निवृत्त अभियंता संघ) संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार सभारंभात नंदकुमार वडनेरे बोलत होते. विविध क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणाऱ्या ११ सेवावृत्तीचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभियंता संघाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष डी. एन. कुलकर्णी, उपाध्यक्ष एस. डी. मन्नीकर, एम. एस. पाणदरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.जनसेवा फाउंडेशनचे डॉ. विनोद शहा, विकासकर्मी अभियंता मित्र मासिकाचे कमलकांत वडेलकर, भगिनी निवेदिता बँकेच्या मीनाक्षी दाढे, कावेरी महाविद्यालयाचे कुशाल हेगडे, स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी, कन्नड संघाच्या रमा हरिहर, अनुवादिका डॉ. उमा कुलकर्णी, जगन्नाथ दाबोले, अरुणा कुलकर्णी, विजय जकातदार आणि अलकनंदा भानू या ११ सेवावृतींचा सत्कार यावेळी करण्यात आला.वडनेरे म्हणाले, ‘अभियंता म्हणून काम करताना आपण अनेक चांगल्या गोष्टींची निर्मिती करीत असतो. निवृत्तीनंतर कुटुंबाला वेळ देतानाच सामाजिक कार्यातही सहभाग घ्यावा. आज समाजातील संवाद हरपल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संस्कारांच्या कमतरतेमुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सामाजिक बांधणी करण्यासाठी अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा.’पी. एस. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. परिमला हुल्याळकर यांनी सूत्रसंचालन केले. एम. एस. पाणदरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणे