अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:10 IST2020-12-09T04:10:29+5:302020-12-09T04:10:29+5:30

पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा पक्षातर्फे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना येत्या ९ ते १५ डिसेंबर ...

Engineering Admission Schedule Announced | अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा पक्षातर्फे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना येत्या ९ ते १५ डिसेंबर या कालावधीत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू असताना येत्या ४ जानेवारीपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामकाजाला सुरुवात केली जाणार आहे.

सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ९ ते १६ डिसेंबर या कालावधीतपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करता येईल. येत्या १५ डिसेंबरनंतर प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना नॉन कॅप राऊंड साठी गृहीत धरले जाणार आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी १८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्यानंतर विद्यार्थ्यांना १९ ते २० डिसेंबर या कालावधीत प्राथमिक गुणवत्ता यादी वर आक्षेप नोंदवता येतील.प्रवेशाची पहिली अंतिम गुणवत्ता यादी २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर येत्या २३ डिसेंबरपासून पहिल्या कॅप राऊंडला सुरुवात होणार आहे.

अभियांत्रिकी प्रवेशाची पहिली फेरी २३ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पूर्ण होईल. प्रवेशाच्या दुसया फेरीला येत्या १ जानेवारी पासून सुरुवात होईल. प्रवेशाची दुसरी फेरी ९ जानेवारी पर्यंत चालणार सीईटी सेल तर्फे प्रसिद्ध करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी सीईटी सेल या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Engineering Admission Schedule Announced