अभियंता तरुणीची लाखाची फसवणूक
By Admin | Updated: May 29, 2017 02:43 IST2017-05-29T02:43:02+5:302017-05-29T02:43:02+5:30
संगणक अभियंता तरुणीच्या हरवलेल्या एटीएम कार्डमधून अज्ञाताने एक लाख रुपये परस्पर काढून घेतले. फसवणूक झाल्याप्रकरणी

अभियंता तरुणीची लाखाची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी :संगणक अभियंता तरुणीच्या हरवलेल्या एटीएम कार्डमधून अज्ञाताने एक लाख रुपये परस्पर काढून घेतले. फसवणूक झाल्याप्रकरणी मोनिकाकुमार सुरेशकुमार (वय २९, रा. बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणक अभियंता असलेल्या मोनिकाकुमार यांनी हिंजवडी येथील एका खासगी कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. मुलाखतीसाठी त्या बावधन येथे गेल्या होत्या. मुलाखतीला जाण्यापूर्वी एका हॉटेलात त्यांनी अल्पोपहार घेतला. त्याचे बिल त्यांनी आॅनलाईन अदा केले. हॉटेलमधून बाहेर पडताना मोनिकाकुमार एटीएम कार्ड विसरल्या. ते एटीएम कार्ड कोणाच्या तरी हाती लागले. त्याचा वापर करून १ लाख रुपये रक्कम परस्पर त्यांच्या खात्यातून काढण्यात आली. याबाबत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, याबद्दल काही माहीत नसल्याचे कर्मचारी सांगताहेत. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.