शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

भीमाशंकर येथील कोंढवळच्या धबधब्यात अभियंता बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 22:05 IST

भीमाशंकर अभयारण्यात कोंढवळ जवळ असलेल्या धबधब्यात अभियंता तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देमित्रांकडून पाण्यात उडया मारून शोध घेण्याचा प्रयत्न

भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यात कोंढवळ जवळ असलेल्या धबधब्यात अभियंता तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. गुणवंत दत्तात्रय पाटील (वय २४)असे त्याचे नाव आहे. तो मुळचा नंदुरबार येथील रहिवासी असून कल्याणी टेक्नो फोर्स कन्हेरसर येथे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत होता. गुरवारी सुटी असल्याने कंपनीमधील निखील जगताप, अक्षय जाधव, मयुर पवार, दत्ता जाधव, नितीन झिने, नितीन गोरे, अरविंद बोंबे, अक्षय ढेरंगे, सचिन पाटील व गुणवंत पाटील हे मोटार सायकलवरुन सकाळी भिमाशंकरला दर्शनासाठी निघाले. भीमाशंकरच्या अलिकडे दोन किलोमीटर कोंढवळ फाटा येथे त्यांनी कोंढवळ धबधब्याचा फलक पाहिला. धबधब्यावर गेल्यानंतर आंघोळीसाठी सर्व जण पाण्यात उरतले. पाण्याबाहेर आल्यानंतर गुणवंत गायब असल्याचे इतरांच्या लक्षात आले. त्याला पोहता येत नव्हते. त्याच्या मित्रांनी पाण्यात उडया मारून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा तपास लागला नाही. कोंढवळ ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला.त्याला पाण्यातून बाहेर काढल्या बरोबर तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तपासणी केल्यावर त्याला घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा वाटेतच मृत्यू झाला.  

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरDeathमृत्यूJunnarजुन्नर