तृतीयपंथीयांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केले प्रोत्साहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:57+5:302021-05-14T04:11:57+5:30

यावेळी तृतीयपंथी फिदा खान तसेच चंद्रभान राव, आनंद ढमढेरे, संतोष काशिलकर, स्वप्निल कांबळे, सूरज बारवसा, बालाजी हूस, दिलीप पाटील ...

Encourage third parties to do corona preventive vaccination | तृतीयपंथीयांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केले प्रोत्साहित

तृतीयपंथीयांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केले प्रोत्साहित

यावेळी तृतीयपंथी फिदा खान तसेच चंद्रभान राव, आनंद ढमढेरे, संतोष काशिलकर, स्वप्निल कांबळे, सूरज बारवसा, बालाजी हूस, दिलीप पाटील उपस्थित होते.

कोरोनामुळे कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळणे बंद झाले असल्याने एकवेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. असे सांगत लस देण्याऐवजी पोटाला मदत करण्याची मागणी तृतीयपंथीयांकडून केली. यावर जऱ्हाड यांनी तृतीयपंथीयांच्या २५ कुटुंबांना अन्नधान्याचे किटचे वाटप करून लस घेण्याचे वचन घेतले. त्यानुसार सध्या ४५ वयोगाटाच्या पुढील व्यक्ती लस घेणार आहेत. तसेच पाहिला १८ ते ४४ वयोगटातीसाठी लस सुरू होताच लस घेण्याचे वचन यावेळी त्यांनी दिले. प्रभागातील या समाजासाठी शाश्वत धोरण राबविण्याची गरज आहे. महापालिकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून यांना कौशल्यआधारित प्रशिक्षण देण्यात येऊन साक्षमीकरण केले जाईल. तसेच कोणाला वैद्यकीय गरज पडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जऱ्हाड यांनी केले.

सध्याच्या परिस्थिती वाईट असून आर्थिक अडचणीत आमचा समाज सापडला आहे. चौकात उभे राहुन मदत मागण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांवर सण आला आहे. मात्र सण साजरा करायला हाती पैसा नाही, असे खान यांनी सांगितले.

Web Title: Encourage third parties to do corona preventive vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.