शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मोठ्या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर : एकनाथ शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 18:46 IST

पुण्यातील मेट्रो चे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार

ठळक मुद्दे मेट्रोच्या दुसऱ्या टीबीएम मशीन चे अनावरणभुयारी मार्गासाठी टीबीएम मशीन  

पुणे : राज्यातील मोठ्या शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व सुरक्षित करण्यावर राज्य शासन भर देणार असून पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यात मेट्रो महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.पुणेमेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट या पाच किलोमीटर भुयारी मार्गासाठी  चार टीबीएम मशीन वापरण्यात येणार आहेत. महामेट्रोच्या वतीने आयोजित पुणे मेट्रोच्या भुयारी कामासाठीच्या 'मुळा' दुसऱ्या टीबीएम मशिनचे अनावरण व कामाचा शुभारंभ आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार अनिल भोसले, महामेट्रोचे संचालक सुब्रमणियम रामनाथ, अतुल गाडगीळ, विनोदकुमार अग्रवाल, वरिष्ठ अधिकारी आदि उपस्थित होते.शिंदे म्हणाले, पुण्यातील मेट्रो चे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.  हे काम कठीण आणि आव्हानात्मक असले तरी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्यामुळे अडचण येणार नाही. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर वेळेची व इंधनाची बचत होण्याबरोबरच वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. महामेट्रो ने मेट्रो चे काम गतीने आणि दजेर्दार पध्दतीने करावे. हे काम निर्देशित वेळेत पूर्ण करुन महामेट्रोने नागरिकांना त्याचा आनंद द्यावा.   पुणे शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोगद्याचे काम सुरू होत असून एकूण चार टीबीएम द्वारे साधारणपणे दहा किलोमीटर लांबीचा बोगदा बनवण्यात येत आहे. पुणे मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महा मेट्रोने जागतिक दर्जाच्या अद्ययावत टीबीएम मशीनचे पाचारण केले आहे.  हे टीबीएम मशीन जपान इन्फ्रास्ट्रक्चर (जेआयएस) आणि आॅस्ट्रेलियन स्टँडर्ड (एएस) या जागतिक मानांकनानुसार आधारित असून त्याचा व्यास 6.65  मीटर आणि लांबी 120 मीटर आहे. हे अवजड मशीन 210 के डब्ल्यूच्या सहा विजेवर चालणाºया मोटारींद्वारे चालवले जाते.

भुयारी मार्गासाठी टीबीएम मशीन  पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा टप्पा भुयारी मार्गाचा आहे. या पाच किलोमीटर भुयारी मागार्साठी चार टीबीएम मशीन वापरण्यात येणार आहेत. यापैकी 'मुळा' या पहिल्या टीबीएम मशीनने 31 नोव्हेंबर 2019 रोजी  कृषी महाविद्यालय पटांगण येथून बोगद्याचे काम सुरु केले आहे. महामेट्रोकडे 'मुळा' हे दुसरे टीबीएम मशिन दाखल झाले असून या कामाचे उद्घाटन आज नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

टॅग्स :Puneपुणेroad transportरस्ते वाहतूकEknath Shindeएकनाथ शिंदेMetroमेट्रो