शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आधी वैद्यकीय यंत्रणा सक्षम करा,नंतरच रुग्णांना दाखल करून घ्या; महापालिकेची 'लाईफलाईन'ला तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 11:31 IST

८०० बेडचे जम्बो हॉस्पिटल उद्घाटनंतर आठ दिवस उलटूनही पूर्णक्षमतेने सुरू होऊ न शकलेले नाही.

ठळक मुद्देक्षमता नसताना जम्बो हॉस्पिटलला रूग्ण दाखल करून न घेण्याचे दिले आदेश

पुणे : कोविड-१९ च्या रूग्णांसाठी मोठा गाजा-वाजा करून उभारलेल्या जम्बो हॉस्पिटल व्यवस्थापनाला, आधी हॉस्पिटलमधील सर्व आरोग्य विषयक यंत्रणा सक्षम करा, पुरेसे डॉक्टर व अन्य पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध करावा व त्यानंतरच नवीन रूग्णांना दाखल करून घ्यावे,अशी तंबी पुणे महापालिकेने दिली आहे. ८०० बेडचे हे जम्बो हॉस्पिटल आठ दिवस उलटूनही पूर्णक्षमतेने सुरू होऊ न शकल्याने, पुणे महापालिकेने पीएमआरडीएकडे  खुलासा मागविला आहे. तसेच पीएमआरडीएकडूनही याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाचे काम असलेल्या ‘लाईफ लाईन’ या एजन्सीला नोटिस पाठविण्यात आली आहे.

जम्बो हॉस्पिटल मध्ये कोविड-१९ च्या रूग्णांसाठी ८०० बेडची व्यवस्था राहणार, रूग्णांना वेळेत व मोफत उपचार मिळणार म्हणून कोट्यावधींचा खर्च प्रशासकीय स्तरावरून करण्यात  आला व कोविड रूग्णांसाठी एक आशेचा किरण दाखविला गेला.  हे करीत असताना आधीच कमकुवत असलेल्या राज्य शासनाच्या व पुणे महापालिकेच्या यंत्रणेला या जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन व वैद्यकीय मनुष्यबळ पुरविणे शक्य नसल्याने,  हे काम खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी पीएमआरडीने निविदा प्रक्रिया राबवून मुंबईमध्ये चार मोठ्या कोविड सेंटर चे काम पाहणाºया ‘लाईफ लाईन’ या एजन्सीला सक्षम एजन्सी म्हणून हे काम दिले. पण ही एजन्सीही या वैद्यकीय सुविधा देण्यामध्ये फोल ठरली असल्याचे खुद्द पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्य केले आहे. त्यामुळे जेवढी क्षमता आहे तेवढेच कोविड-१९ चे रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्या अशी तंबीच त्यांनी ‘लाईफ लाईन’ एजन्सीला दिली आहे.

८०० बेडच्या या जम्बो हॉस्पिटलमध्ये ३६० रूग्णांपेक्षा जास्त रूग्णांना आजतरी ‘लाईफ लाईन’ वैद्यकीय सेवा देऊ शकत नसल्याचे वास्तव असल्याचेही विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.तर या एजन्सीच्या अपयशामुळे महापालिकाच आता त्यांना काही डॉक्टर पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे. गुरूवारी रात्री येथे १६ डॉक्टर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर या एजन्सीच्या बरोबरच ज्या दोन अन्य एजन्सींनी जम्बो हॉस्पिटलकरिता निविदा सादर केल्या होत्या, त्यांच्याशी बोलून येथील कमतरता दूर करण्यासाठी पॅरामेडिकल स्टाफ घेण्यात येणार आहे. तसेच पिंपरी येथी जम्बो हॉस्पिटलमधील अतिरिक्त पॅरामेडिकल स्टाफ याठिकाणी मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

--------------------------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरcommissionerआयुक्तHealthआरोग्य