स्वीस कंपन्यांचे पुण्यात रोजगार कौशल्य केंद्र
By Admin | Updated: June 7, 2015 21:38 IST2015-06-07T21:38:38+5:302015-06-07T21:38:38+5:30
तरुणांना रोजगारासाठी व्यावसायिक कौशल्य देता यावे म्हणून स्वीस कंपन्यांच्या एका गटाने पुणे येथे केंद्र सुरू करण्याची योजना तयार केली आहे.

स्वीस कंपन्यांचे पुण्यात रोजगार कौशल्य केंद्र
नवी दिल्ली : तरुणांना रोजगारासाठी व्यावसायिक कौशल्य देता यावे म्हणून स्वीस कंपन्यांच्या एका गटाने पुणे येथे केंद्र सुरू करण्याची योजना तयार केली आहे. या केंद्रात वेगवेगळ्या उत्पादनांसाठी व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम चालतील.
स्वीस कंपन्यांमार्फत पुणे येथील मल्होत्रा वेकफिल्ड फाऊंडेशनबरोबर सेंटर फॉर एक्सलन्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग स्थापन केले जाईल. प्रारंभी स्वीत्झर्लंडच्या पाच कंपन्या-बर्कहार्ट कंप्रेशन, सिजेंटा फाऊंडेशन, सल्जर इंडिया, रिएटर फाऊंडेशन आणि हिल्टी एकत्र येऊन हे केंद्र स्थापन करतील. या कंपन्या पुण्यामध्ये कार्यरत आहेत. बर्कहार्ट कंप्रेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नरसिंह राव यांनी म्हटले आहे की, केंद्र २०१६-२०१७ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.