‘कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँकेतून द्यावे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2015 00:47 IST2015-06-30T00:47:13+5:302015-06-30T00:47:13+5:30
महापालिका सेवेत ठेकेदारांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिका प्रशासनाने थेट बँकेत जमा करावे, अशी सूचना उपमहापौर आबा बागूल

‘कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँकेतून द्यावे’
पुणे : महापालिका सेवेत ठेकेदारांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिका प्रशासनाने थेट बँकेत जमा करावे, अशी सूचना उपमहापौर आबा बागूल यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, यासाठी बागूल यांनी कामगार सल्लागार तसेच सामान्य प्रशासन विभागाची बैठक सोमवारी बोलावली होती. या बैठकीत ही सूचना केल्याचे बागूल सांगितले. कर्मचाऱ्यांसाठी मनपा प्रशासन किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत असली, तरी ते मिळत नाही. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन याबाबत उपाययोजना कराव्या, अशी सूचना बागूल यांनी या बैठकीत केली. उपायुक्त मंगेश जोशी, समाजविकास अधिकारी हनुमंत नाझीरकर, कामगार सल्लागार अधिकारी नितीन केंजळे या वेळी उपस्थित होते.