खासगी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला डुलकी पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:28 IST2020-12-12T04:28:27+5:302020-12-12T04:28:27+5:30

पुणे : खासगी कुरिअर सर्व्हिस मध्ये पार्सल डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला एस. टीमध्ये लागलेली डुलकी चांगलीच महागात ...

An employee of a private courier company fell asleep | खासगी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला डुलकी पडली महागात

खासगी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला डुलकी पडली महागात

पुणे : खासगी कुरिअर सर्व्हिस मध्ये पार्सल डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला एस. टीमध्ये लागलेली डुलकी चांगलीच महागात पडली. त्याच्याकडील ५ लाख ५० हजार रूपयांची रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. दोन दिवसांपूर्वी आरामदायी एस. टी बसप्रवासात ही घटना घडली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मयूर विठ्ठल मुळीक (वय २४, रा. खिस्त गल्ली कापड बाजार, अहमदनगर) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर हा एका खासगी कुरिअर सर्व्हिस कंपनीत कामाला आहे. ९ डिसेंबरला तो नगर ते

पुणे बसने प्रवास करीत होता. नगरमध्ये कुरिअर सर्व्हिसची जमा झालेली ५ लाख ५० हजार रूपयांची रक्कम होती. प्रवासादरम्यान त्याला डुलकी लागली. त्याने डोक्याखाली ठेवलेली बँग अज्ञात चोरांनी लंपास केली.

Web Title: An employee of a private courier company fell asleep