शिक्षकांची लगबग, विद्याथ्र्यामध्ये उत्सुकता
By Admin | Updated: September 6, 2014 00:05 IST2014-09-06T00:05:59+5:302014-09-06T00:05:59+5:30
शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध शाळांतील विद्याथ्र्याशी संवाद साधण्याचे जाहीर केले होते.

शिक्षकांची लगबग, विद्याथ्र्यामध्ये उत्सुकता
शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध शाळांतील विद्याथ्र्याशी संवाद साधण्याचे जाहीर केले होते. या उपक्रमाला जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. टीव्ही, रेडिओवरून, तर काही ठिकाणी लॅपटॉवरून संवाद साधला. खेड तालुक्यात वीज गेल्याने काही वेळ व्यत्यय आला होता, तर उर्वरित ठिकाणी उत्तम प्रतिसाद लाभला.
माळेगाव : येथे शिवतीर्थ कार्यालयात हजारो विद्याथ्र्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद ऐकला. त्यासाठी स्वतंत्र ‘स्क्रिन’ची सोय करण्यात आली होती, तर माळेगावात 25क्क् विद्याथ्र्यानी पंतप्रधानांचा संवाद ऐकला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्याथ्र्याशी संवाद साधणार असल्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार माळेगाव येथील शिवतीर्थ मंगल कार्यालयात ‘स्क्रिन’ बसवण्यात आली होती.
शारदाबाई पवार विद्यालय, शिशू विहार शिवनगर आदी शाळांचे विद्यार्थी, शिक्षक या
वेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या
भाषणाबाबत विद्याथ्र्यामध्ये उत्सुकता
दिसून आली. भाषणाला सुरूवात
झाल्यावर विद्याथ्र्यानी तल्लीन होऊन भाषण ऐकले. पंतप्रधानांचा प्रथमच विद्याथ्र्याशी झालेला संवाद या वेळी विद्यार्थी, शिक्षकांमध्ये चर्चेचा विषय होता. विद्याथ्र्याच्या गर्दीने हा परिसर गजबजला होता.
4शारदाबाई पवार विद्यालय, शिशू विहार शिवनगर आदी शाळांचे विद्यार्थी, शिक्षक या वेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या
भाषणाबाबत विद्याथ्र्यामध्ये उत्सुकता
दिसून आली.
4पंतप्रधानांचा प्रथमच विद्याथ्र्याशी झालेला संवाद या वेळी विद्यार्थी, शिक्षकांमध्ये चर्चेचा विषय होता.
शिक्षणाला मर्यादा नाही
यशस्वी व्यक्तींमागे शिक्षक असतात. त्यामुळे शिक्षकांचे मार्गदर्शन विद्याथ्र्यासाठी मोलाचे आहे. शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. समाजातील सुशिक्षित वर्गाने शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्याथ्र्याना शिक्षण द्यावे. त्यामळे विद्याथ्र्याच्या ज्ञानाजर्नात वाढ होईल, असे या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.