आणीबाणीतील धक्कादायक निकाल

By Admin | Updated: October 1, 2014 00:38 IST2014-10-01T00:38:20+5:302014-10-01T00:38:20+5:30

1977मध्ये जनता पक्षाची सत्ता असताना राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेसची दोन-तीन शकले झाली होती.

Embarrassing shocking results | आणीबाणीतील धक्कादायक निकाल

आणीबाणीतील धक्कादायक निकाल

>पुणो : 1977मध्ये जनता पक्षाची सत्ता असताना राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेसची दोन-तीन शकले झाली होती. शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसने सुरेश कलमाडी या तरुण उमेदवाराला संधी दिली होती. जनता पक्षाच्या शांती नाईक त्यांच्याविरुद्ध उमेदवार होत्या. इंदिरा गांधी यांना पराभूत करणारे राजनारायण या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी शांती नाईक संबंधित होत्या. मात्र, त्या पुण्याशी फारशा संबंधित नसल्याने काहीशा अनोळखीच होत्या. 
कलमाडी वैमानिक म्हणून सैन्यदलातून निवृत्त होऊन पूना कॅफे हाऊस या त्यांच्या डेक्कनवरील हॉटेलचा कारभार सांभाळत. युवक काँग्रेसचे ते पदाधिकारी होते. त्यांच्याभोवती कार्यकत्र्याचा मोठा ताफा असे. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर एनएसयूआय, युवक काँग्रेसच्या कार्यकत्र्यामध्ये उत्साह संचारला. अनेक ठिकाणी निवडणूक कचे:या सुरू केल्या गेल्या.
कलमाडी यांच्या कार्यकत्र्यानी प्रचाराची धूम उडवून दिली. ‘देशभक्त वैमानिकाला निवडून द्या’ अशा मजकुराने ¨भती रंगल्या. रात्रीअपरात्री जागून कार्यकर्ते पोस्टर चिकटवीत असत.  
शिवाजीनगर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाई. कलमाडींच्या भपकेबाज प्रचाराच्या पाश्र्वभूमीवर शांती नाईक यांचा प्रचार साधा होता. त्यांना फारसे कोणी ओळखत नव्हते. 
अन्य शहरात त्या स्थायिक होत्या. त्यांची पोस्टर फारशी नव्हती. एखाद्या रिक्षावरच्या कण्र्यातून प्रचाराचा आवाज ऐकू येई. कलमाडी यांच्या कार्यकत्र्याना पूना कॅफे हाऊसमध्ये नाश्ता, जेवण, चहा यांसाठी मुक्तद्वार असे. निवडणूक कचे:यांमध्ये कार्यकत्र्याना याबद्दलची विनामूल्य कूपन्स दिली जात. 
 
खिलाडू वृत्तीने स्वीकारला पराभव
4कलमाडी यांच्या वलयामुळे ते निवडून येणार असे वाटत होते; मात्र मतमोजणी सुरू झाली तेव्हा 13 हजार मतांनी पराभूत झाले. या वेळी कार्यकत्र्याना मोठे आश्चर्य वाटले. कलमाडींनी खिलाडू वृत्तीने तो पराभव घेतला. नंतर राज्यसभेत जाऊन ते थेट खासदारच झाले.

Web Title: Embarrassing shocking results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.