शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालय रिकामे करा, तुकाराम मुंढे यांचा काँग्रेसलाही झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 05:44 IST

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काँग्रेसप्रणीत इंटक

पुणे : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काँग्रेसप्रणीत इंटक या संघटनेला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.राष्ट्रवादी कामगार युनियनचे कार्यालय ‘पीएमपी’च्या भांडार विभागासमोरील इमारतीत काही वर्षांपासून होते. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरातच हे कार्यालय रिकामे करण्याची नोटीस संघटनेला बजावली होती. मुदतीपूर्वी तीन महिने आधीच कार्यालय ताब्यात घेण्यात आले. याला संघटनेच्या वतीने तीव्र विरोधही करण्यात आला.प्रशासकीय कारणासाठी ही इमारत आवश्यक असल्याने ताब्यात घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने त्या वेळी स्पष्ट केले होते. आता हीच वेळ पीएमपी कामगार संघटनेवर (इंटक) आली आहे. पीएमपी प्रशासनाने सोमवारी इंटकला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.करार मोडणे बेकायदेशीरइंटकचे कार्यालय मुख्य इमारतीशेजारील दुसºया इमारतीमध्ये आहे. ते रिकामे करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. काही महिन्यांपासून कार्यालयाचे भाडे थकले आहे. तसेच, हे कार्यालय प्रशासकीय कारणासाठी आवश्यक असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आल्याचे समजते. या नोटिशीवर संघटनेच्या पदाधिकाºयांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.हे कार्यालय इंटकला १९५९मध्ये ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आले आहे. त्यासाठी प्रतिमहिना एक रुपया भाडे आकारले जाते. औद्योगिक विवाद कायद्यानुसार हा करार झाला आहे; त्यामुळे अशा प्रकारे तो मोडणे बेकायदेशीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे संघटनेकडून या कारवाईविरोधात कायदेशीर पाऊल उचलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcongressकाँग्रेस