शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'पीएसआय'साठी मैदानी चाचणी केली पात्र ; राज्य सेवा परीक्षेसाठी 'सीसॅट'कधी पात्र करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 23:20 IST

यूपीएससीचे अनुकरण करण्यात एमपीएसी का थांबली?स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांचा प्रश्न 

- अमोल अवचितेपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) कडून घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी मैदानी चाचणी पात्र करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर राज्य सेवा परीक्षेसाठी पूर्व परीक्षेला असणारा सीसॅट हा पेपर कधी पात्र करणार ?, असा प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे.   

एमपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षा पद्धतीचे अनुकरण करते. त्याप्रमाणे एमपीएससीने यूपीएससीच्या धर्तीवर सीसॅट पेपर लागू केला. तसेच काही दिवसांपूर्वी यूपीएससी प्रमाणे परीक्षा देण्यावरही मर्यादा घातल्याचा निर्णय घेतला. यूपीएससीने लागू केलेल्या सीसॅट पेपरमुळे ग्रामीण भागातील उमेदवारांचे नुकसान होत असल्याचे कारण पुढे करून उमेदवारांनी विरोध केला. त्यानुसार अरुण निगवेकर आणि अरविंद कुमार या दोन समित्या स्थापन करून सीसॅट केवळ पात्र करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर एमपीएससीने विचार करून वेळीच सीसॅट पात्र करावे, अशी मागणी गेल्या पाच वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र सीसॅटच्या निर्णयाचे अनुकरण करण्यासाठी एमपीएसी का थांबली आहे ?, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. 

स्पर्धा परीक्षेत समान संधी असणे आवश्यक आहे. सीसॅट पेपरचे गुण ग्राह्य धरून मुख्यपरीक्षेसाठी निवड केली जाते. यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना याचा फटका बसत असून नुकसान होत आहे. त्यामुळे समसमान संधीचे धोरण येथे लागू होत नाही. विशिष्ठ शाखेतीलच उमेदवारांना याचा फायदा होत आहे. सीसॅट पात्र करण्याच्या निर्णयात नेमके कोण आडकाठी करीत आहे. याचा शोध घेण्याची गरज असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

पाच वर्षापासून मागणी करण्यात येत आहे. नेमके याच मुद्यावर युपीएसीचे अनुकरण एमपीएससी करत नाही. सामान्य अध्ययन पेपर मध्ये अपेक्षित गुण असून केवळ सीसॅट पेपर मद्ये काही गुण कमी पडल्याने मुख्य परीक्षा देता आली नाही.-

ज्योतीराम जाधव, परीक्षार्थी. 

.....

सीसॅट पात्र करावा असे अनेक स्पर्धा परीक्षेतील तज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार आम्ही एपीएसीला अनेकवेळा मागणी केली आहे. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीने निर्णय घेणे आवश्यक आहे.    महेश बडे, एमपीएससी स्टुडंट राईट्स. 

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीexamपरीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोगState Governmentराज्य सरकार