शिक्षणाबरोबरच पात्रताही महत्त्वाची
By Admin | Updated: January 25, 2017 01:24 IST2017-01-25T01:24:30+5:302017-01-25T01:24:30+5:30
‘‘जिद्द व नैतिकतेच्या बळावर अडथळ्यांवर मात करता येते. यामुळे आपल्या स्वप्नातील विश्व साकार करता येते. फक्त इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले

शिक्षणाबरोबरच पात्रताही महत्त्वाची
नारायणगाव : ‘‘जिद्द व नैतिकतेच्या बळावर अडथळ्यांवर मात करता येते. यामुळे आपल्या स्वप्नातील विश्व साकार करता येते. फक्त इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले, म्हणून इंजिनिअरिंगमध्ये करिअर करता येते असे नाही तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करीत राहिल्यास काहीही अशक्य नाही. आपले ध्येय गाठण्यासाठी त्याचा ध्यास
उराशी बाळगून काम करीत राहावे. शिक्षण जेवढे महत्त्वाचे त्यापेक्षा पात्रता अधिक महत्त्वाची असते,’’ असे प्रतिपादन लायन्स इंटरनॅशनल क्लबचे एम. जे. एफ. ला. हेमंत नाईक यांनी कुरण येथे केले.
कुरण येथील जयहिंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचा पदवीग्रहण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी जयहिंद शैक्षणिक संकुलाचे संस्थापक-अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स इंटरनॅशनल क्लबचे एम. जे. एफ. ला. हेमंत नाईक उपस्थित होते. जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीग्रहण समारंभामध्ये ३५० विद्यार्थ्यांनी पदवी ग्रहण केली.
हेमंत नाईक म्हणाले, की चेतन भगत हे इंजिनिअर असूनही लिखाणामधून आपले करिअर केले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेली व्यक्ती दुधाचा उत्तम व्यापार करते. यामधून हे दिसून येते, की
माणसाने आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व ध्येयासाठी लढावे. उद्दिष्टे गाठण्यासाठी गुरूंचे कार्य मौल्यवान असते.
तात्यासाहेब गुंजाळ म्हणाले, की विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात आपले करिअर करावे. सध्या आपल्या देशात व्यवसायासाठी पूरक वातावरण
आहे, याचा विद्यार्थ्यांनी अवश्य
लाभ घ्यावा.
या वेळी व्ही. आर. डी. ई.चे
माजी संचालक डॉ. सी. एल. धमेजानी संस्थेचे संचालक एन. एम. काळे, जितेंद्र गुंजाळ, संदीप मुथ्था, संतोष सोनवणे, मुख्य कार्यकारी
अधिकारी डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. जाधवर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य योगेश गुंजाळ, सर्व विभागप्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)