शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पुण्यात व्यापारी संघटनांचा एल्गार; अन्नधान्य, दूध वगळता तीन दिवस दुकाने राहणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 20:29 IST

तब्बल ४० हजार दुकानदार बंदमधे सहभागी

ठळक मुद्देव्यापारी महासंघाचा निर्णय : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने राहणार सुरू 

पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, रविवार पेठेसह शहरातील सर्व बाजारपेठा १७ ते १९ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स ऑफ पुणेने (व्यापारी महासंघ) सोमवारी (दि. १६) घेतला. औषध, अन्नधान्य-भाजीपाल्याची दुकाने वगळता शहरातील सोने, कपडे, इलेक्ट्रॉनिक अशा सर्वच बाजारपेठा बंद राहतील.  नारायण पेठेतील सराफ असोसिएशनच्या सभागृहामधे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, वरिष्ठ उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष रतन किराड, सचिव महेंद्र पितळिया, सहसचिव जयंत शेटे, अभय गाडगीळ या वेळी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. नागरिकांच्या हिताकरिता सराफ, होजिअरी व कापड, ऑटोमोबाईल, प्लायवूड आणि टिंबर मार्केट, स्टेनलेस स्टील, नॉन फेरस मेटल, पेपर, प्लॅस्टिक, इलेक्ट्रिक अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक, मशिनरी आणि वेल्डिंग, संगणक, खेळण्यांची दुकाने, घड्याळे, सायकल दुकानदार, रसायन, कर्वे रस्ता, रविवार पेठ व्यापारी संघटना यामधे सहभागी होणार आहेत. विविध प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या ८२ संघटना महासंघाच्या सभासद आहेत. औषध आणि जीवनावश्यक वस्तू वगळता शहरातील सुमारे ४० हजार दुकानदार तीन दिवस दुकाने बंद ठेवणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव पितळिया यांनी दिली. यापूर्वी केवळ स्थानिक संस्था कर (एलबीटी) आंदोलनाच्या कालावधीत सर्व दुकाने बंद होती. शहरात २००९मध्ये स्वाइन फ्लूचा उद्रेक झाला, त्या वेळीदेखील सराफ व्यवसायिकांनीच दुकाने बंद ठेवली होती. इतर बाजारपेठा सुरळीत सुरू होत्या, असे पितळिया यांनी सांगितले.  

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर बाजारपेठा बंद राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी, तेल, साखर, डाळी या बाजारपेठा सुरू राहणार असल्याचे दि पूना मर्चंट्स चेंबर असोसिएशनचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. ०००जीवनावश्यक असल्याने दुधाचे संकलन आणि वितरण सुरळीत सुरू आहे. दुधाचा कोणताही तुटवडा नाही. तसेच, दूध आणि किराणा दुकाने सुरू राहणार आहेत.-श्रीकृष्ण चितळे, दूध आणि मिठाई व्यावसायिक ०००

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायjewelleryदागिनेMarketबाजारStrikeसंप