दौंड-पुणे शटलसाठी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:40+5:302021-01-13T04:25:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दौंड: काेरोनामुळे रेल्वेसेवा बंद आहे. यामुळे पुण्याला जाणाऱ्या कामगार वर्गाची गैरसोय होत आहे. यामुळे दाैड-पुणे ...

दौंड-पुणे शटलसाठी एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड: काेरोनामुळे रेल्वेसेवा बंद आहे. यामुळे पुण्याला जाणाऱ्या कामगार वर्गाची गैरसोय होत आहे. यामुळे दाैड-पुणे शटल सेवा त्वरित सुरू करण्यात यावी, अन्यथा येत्या रविवारी (दि. १७) रेल्वे रोकाे आंदोलन करण्यात येईल असा इशारा
दौंड-पुणे प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी रविवारी झालेल्या पक्षीय बैठकीत दिला.
दौंड-पुणे प्रवासी संघटनेच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेसेवा बंद आहे. परिणामी, दौंड येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिणामी, काही कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर वाहनांनी पुण्याला जाणे परवडत नाही. दौंड-पुणे रेल्वे शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडे केली जात आहे. मात्र, याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत आहे. येत्या रविवारी (दि. १७) सकाळी ९ वाजता रेल्वे कुरकुंभ मोरीवरील लोहमार्गावर आंदोलन केले जाईल असा इशारा कटारिया यांनी दिला.
या वेळी बादशाह शेख, ॲड. अजित बलदोटा, राजेंद्र ओझा, बाबा शेख, नागसेन धेंडे, अनिल साळवे, सचिन कुलथे, भारत सरोदे, अनिल सोनवणे, आयुब तांबोळी, फिरोज खान, असीम सरोदे, दत्तात्रय टेकावडे, किसन कोंडलकर यांनी मनोगत व्यक्त करत रेल्वे प्रशासनावर टीका केली.
या वेळी नगराध्यक्षा शीतल कटारिया यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास देशपांडे यांनी केले.
( चौकट )
चौकट
मुंबईत लोकल सेवा सुरू होते. पुणे-लोणावळा लोकल सेवाही सुरू आहे. परंतु दौंड-पुणे शटल सेवा सुरू करण्यास रेल्वे प्रशासन उदासीन का ? यामुळे रेल्वे कार्यालयांना टाळे ठोकल्याशिवाय रेल्वे खात्याला जाग येणार नाही. आंदोलन केले तर फाशीची शिक्षा होणार नाही. कारण दौंडकरांना भांडूण मागीतल्याशिवाय काही मिळत नाही.
- प्रेमसुख कटारिया, नगरसेवक
चौकट
[ इथ बादशाभाई आमचे मित्र ]
दौंड नगर परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते बादशाह शेख आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांचा सवतासुभा तालुक्याला परिचीत आहे. या वेळी जाहीर भाषणात कटारिया म्हणाले की, बादशाभाई आणि माझ्यात नगर परिषदेत जुगलबंदी होते. मात्र या बैठकीत ते माझे मित्र आहे. जनतेच्या सोईसाठी सर्व राजकीय पक्ष रेल्वेच्या निषेर्धात एकत्रित आले ही समाधानाची बाब आहे. वेळ पडल्यास गटनेते बादशाहभाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायला तयार आहोत. ----------------------------
मात्र, जनतेच्या हितासाठी राजकारण करणार नाही असे शेवटी कटारिया म्हणाले.
( चौकट )
[ आज पुण्यात रेल्वेची बैठक ]
दौंड रेल्वे संबंधीच्या विविध समस्या आणि प्रश्नांबाबत पुणे येथे रेल्वे विभागीय कार्यालयात सोमवार (दि. ११) रोजी सकाळी १० वाजता खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठक बोलावली असल्याची माहिती दौंड पुणे प्रवासी संघटनेचे सचिव विकास देशपांडे यांनी दिली. या बैठकीला रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच प्रवासी संघटनेचे तसेच दौंडचे सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
फोटो ओळ १) दौंड येथे रेल्वे समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठकीत बोलताना प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रेमसुख कटारिया.
२) दौंडला रेल्वे प्रशासनाच्या निषेर्धात एकत्रित आलेले प्रवासी आणि राजकीय कार्यकर्ते.