शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अकरा गावांचा पुणे महापालिकेत समावेश; गावांमधील दफ्तराची झाली देवाणघेवाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 19:01 IST

महापालिकेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील अकरा गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे येथे कार्यरत असलेले ५९२ कर्मचारी आणि १५ कोटी रुपयांचा निधीही पालिककडे जमा होणार आहे.

ठळक मुद्दे१५ कोटी २१ लाख ६७ हजार ९३ रूपये निधीची रक्कम पालिकेच्या या ११ गावांच्या खात्यात होणार जमा कर्मचार्‍यांना हस्तांतरण करण्यासंदर्भात कोणताही निर्णय नाही : विश्वास देवकाते

पुणे : पुणे महापालिकेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील अकरा गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे येथे कार्यरत असलेले ५९२ कर्मचारी आणि १५ कोटी रुपयांचा निधीही पालिककडे जमा होणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडून सर्व अहवाल देण्यात आला आहे. आता महापालिका स्तरावर कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी संयुक्तपणे दिली.या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासन आणि पुणे महापालिका प्रशासनादरम्यान नुकतीच एक बैठक झाली. त्या बैठकीत महापालिकेत समावेश झालेल्या अकरा गावांच्या दफ्तराची देवाण घेवाण करण्यात आली. त्यामध्ये या कर्मचार्‍यांसंदर्भातील माहिती देण्यात आली.पुणे महापालिकेच्या हद्दीत जिल्ह्यातील अकरा गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्या संदर्भात राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उंड्री, धायरी, शिवणे, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, लोहगाव या गावांचा समावेश आहे. या गावांमधील दफ्तराची देवाणघेवाण झाली आहे. अकरा गावांमध्ये स्थानिक कर निधी म्हणून काही निधी जमा होता. त्यामध्ये ग्रामनिधी, पाणी पुरवठा कर, तसेच १४ व्या वित्त आयोगाचा निधी अशा निधींचा समावेश आहे. अकरा गावांमध्ये मिळून १५ कोटी २१ लाख ६७ हजार ९३ रूपये निधीची रक्कम देखील पालिकेच्या या ११ गावांच्या खात्यात जमा होणार आहे, असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या ११ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ५९२ कर्मचारी कार्यरत आहेत. दफ्तरांसह या कर्मचार्‍यांचे देखील महापालिकेत हस्तांतरण करावे लागणार आहे. या कर्मचार्‍यांची यादी आम्ही पालिकेला दिली आहे. परंतु, पालिकेत अद्याप या कर्मचार्‍यांना हस्तांतरण करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. त्याबाबतची कार्यवाही पालिका पातळीवरून होईल. - विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद 

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका