अकरा तोळे सोने भरदिवसा लंपास

By Admin | Updated: May 27, 2014 07:01 IST2014-05-27T07:01:21+5:302014-05-27T07:01:21+5:30

चिंचवडमधील दळवीनगर भागात भरदिवसा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून ११ तोळे सोने व २६ हजार रपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

Eleven Tola gold dawn lamps | अकरा तोळे सोने भरदिवसा लंपास

अकरा तोळे सोने भरदिवसा लंपास

चिंचवड : चिंचवडमधील दळवीनगर भागात भरदिवसा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून ११ तोळे सोने व २६ हजार रपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. उज्वल पार्क या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर ९ क्रमांकाच्या सदनिकेच्या दरवाजा उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम लंपास केली. या बाबत धर्मराज गायकवाड यानी चिंचवड पोलिसांनाकडे फिर्याद दिली आहे. गायकवाड यांच्या पत्नी दुपारी टेरेसवर धान्य सुकविन्यासाठी गेल्या होत्या. १५ मिनिटांनी त्या घराकडे आल्या तेव्हा त्यांना धक्का बसला. काही वेळातच चोरीचा प्रकार घडल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. रात्री उशिरापर्यंत तक्रार घेण्याचे काम सुरु होते. (वार्ताहर)

Web Title: Eleven Tola gold dawn lamps