अकरा गाळ्यांतील माल सील
By Admin | Updated: March 24, 2017 03:47 IST2017-03-24T03:47:22+5:302017-03-24T03:47:22+5:30
नगर परिषद कार्यालय इमारतीतील आठ व नवीन व्यापारी संकुलातील तीन, अशा ११ गाळ्यांमधील माल आच्छादन टाकून

अकरा गाळ्यांतील माल सील
शिरूर : नगर परिषद कार्यालय इमारतीतील आठ व नवीन व्यापारी संकुलातील तीन, अशा ११ गाळ्यांमधील माल आच्छादन टाकून आज भाडे व करथकबाकी प्रकरणी सील लावण्यात आले. नगर परिषद इमारतीतील आठ गाळ्यांची चार वर्षांची सुमारे ५0 लाखांची थकबाकी असल्याने त्यांच्या जंगम मालमत्तेला सील लावल्याचे मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी सांगितले. ही कारवाई न्यायालयाचा आदर राखून केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नगर परिषदेने न्यायालयाचा अवमान केल्याचे गाळेधारकांनी म्हटले आहे.
नगर परिषदेत इमारतीत नगर परिषदेच्या मालकीचे व्यापारी गाळे आहेत. यापैकी आठ गाळ्यांना आज मुख्याधिकारी पोळ यांनी पोलीस बंदोबस्तात सील लावले. त्या म्हणाल्या की, २0१२ मध्ये त्रि-सदस्यीय समिनीने व्यापारी गाळ्यांची भाडे निश्चिती केली. यानुसार गाळेधारकांनी भाडे व कर भरणे अपेक्षित होते; मात्र गेल्या चार वर्षांपासून त्यांनी भाडे व कर यानुसार भरला नाही.
५0 लाख रुपयांच्या थकबाकीसाठी नगर परिषदेसाठी गाळेधारकांना वारंवार नोटीस बजावल्या. मात्र, यास प्रतिसाद न मिळाल्याने कारवाई करण्यात आल्याचे मुख्याधिकारी पोळ यांनी सांगितले.
त्रि-सदस्यीय समितीने ठरवून दिलेले भाडे आम्हाला मान्य नसून, आम्ही या विरोधात न्यायालयात दावा दाखल केल्याचे गाळेधारकांनी सांगितले.
१९९९ मध्ये नगर परिषदेने या गाळेधारकांना गाळे खाली करण्यास सांगितले. (वार्ताहर)