शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अकरा गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 19:17 IST

गेल्या वर्षभरात तडीपारीची कारवाई केलेल्या गुन्हेगारांची संख्या झाली साठ

ठळक मुद्देगुन्हेगारी मुक्त पिंपरी चिंचवड अंतर्गत केली कारवाई

पिंपरी: शहरात कायदा सुव्यवस्था रहावी यासाठी अधिकाधिक गुन्हेगार गजाआड राहतील अथवा शहरापासून ते दूर राहतील याची काळजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून घेतली जात आहे. शहरातील अकरा सराईत पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात तडीपारीची कारवाई केलेल्या गुन्हेगारांची संख्या साठ झाली आहे.

गुन्हेगारी मुक्त पिंपरी चिंचवड या मोहिमेअंतर्गत पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी ४९ गुन्हेगारांना मागकत्या वर्षी तडीपार केले. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) ५ टोळ्यांमधील २३ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. म्हणजेच मोक्का आणि तडीपरी अंतर्गत ७२ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.  आता भोसरी पोलीस ठाण्यातील 3, चाकण, आळंदी आणि दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 2, चिंचवड आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा अकरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शकील कासीम शेख (वय २४, रा. कासारवाडी),  अमोल शांताराम नितोने (वय २०, रा. भोसरी), रवींद्र उर्फ गोट्या बन्सीलाल भालेराव (वय २२, रा. भोसरी), ओंकार मच्छिंद्र झगडे (वय २४, रा. चाकण), रोहन महेंद्र घोगरे (वय २२, रा. चाकण), गौरव धर्मराज भूमकर (वय २३, रा.खेड), दिगंबर उर्फ दिग्या विठ्ठल कदम ( वय 30, रा. आळंदी), राहुल एकनाथ धनवडे (वय २१, रा.चऱ्होली), महेंद्र रवींद्र वाघमारे (वय ४५, रा. बोपखेल), वीरेंद्र उर्फ भोलेनाथ सोनी (वय २०, चिंचवड), सागर आत्माराम गायकवाड (वय २४, मोशी) अशी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या सर्व आरोपींना २६ मार्चपासून दोन वर्षांसाठी शहर आयुक्तालय, पुणे पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस हद्दीतून तडीपार केले आहे.

मोक्का अंतर्गत सात टोळ्यांमधील ४७ गुन्हेगार जेरबंदपोलिसांनी मागील वर्षात सात गुन्हेगारी टोळ्यांमधील ४७ गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. अजून तीन टोळ्यांमधील ३२ गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर एका सराईत गुन्हेगारावर झोपडपट्टी दादा कायद्यांर्गत (एम पी डी ए) कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी