अकरा सहायक आयुक्तांच्या बदल्या

By Admin | Updated: August 17, 2016 00:57 IST2016-08-17T00:57:03+5:302016-08-17T00:57:03+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ११ सहायक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. या संदर्भातील आदेश मंगळवारी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले असून, तत्काळ बदलीच्या जागेवर रुजू व्हा

Eleven Assistant Transfers | अकरा सहायक आयुक्तांच्या बदल्या

अकरा सहायक आयुक्तांच्या बदल्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ११ सहायक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. या संदर्भातील आदेश मंगळवारी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले असून, तत्काळ बदलीच्या जागेवर रुजू व्हा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे काही विभागप्रमुखांनी आदेश मिळताच पदभार आणि अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. अचानकपणे केलेल्या बदलांमुळे काही अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून स्थायी समितीत मंजूर होणारे ठराव, नागरवस्ती विभाग, नगररचना, बांधकाम परवाना विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण, उद्यान, भांडार विभाग, स्थापत्य, जनता संपर्क विभाग या विषयी तक्रारी वाढल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’नेही वृत्त प्रकाशित केले. आयुक्तांनी याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार आज आयुक्त वाघमारे यांनी नऊ सहायक आयुक्तांच्या आणि दोन प्रशासन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
ब क्षेत्रीय कार्यालयाचा कार्यभार सुभाष माछरे यांच्यावर सोपविला आहे. ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यभारासह चंद्रकांत खोसे यांच्याकडे अग्निशामक विभाग, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा विभागाचा कार्यभार सोपविला आहे. ई क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे क्षेत्रीय कार्यालयासह कामगार कल्याण विभागाचा कार्यभार सोपविला आहे. मनोज लोणकर यांच्याकडे फ क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. सह आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे करसंकलन, अभिलेख जबाबदारी सोपविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Eleven Assistant Transfers