शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बिजली फुलांचे भाव कडाडले; शेतकऱ्यांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 00:32 IST

गणेश चतुर्थीपासून बिजली फुलांचे बाजारभाव वधारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार

गराडे : गेल्या आठवड्यात बिजली फुलांच्या घसरलेल्या बाजारभावामुळे पुरंदर तालुक्यातील बिजली उत्पादक आर्थिक संकटात सापडला होता. परंतु गणेश चतुर्थीपासून बिजली फुलांचे बाजारभाव वधारल्याने शेतकºयांना आर्थिक फायदा होणार आहे.यंदा पुरंदर तालुक्यात बिजली फुलांची शेती चांगलीच फुलली आहे. बिजली उत्पादक शेतकºयांनी केलेली काळजीपूर्वक देखभाल, स्वच्छ हवामान यामुळे बिजली फुलांचे प्रचंड उत्पादन झाले आहे. आवक वाढल्यामुळे बिजली फुलांचे बाजारभाव कोसळले होते. त्यामुळे बिजली उत्पादक शेतकºयांना आर्थिक तोटा सहन करावा लागला.पुरंदर तालुक्याला खेटून लगतच पुणे शहराची फुलांना मोठी बाजारपेठ असल्याने बिजली फुलांची चांगली विक्री होऊन नफा मिळतो. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकरी शेतात राबून बिजली फुलांचे मळे फुलवितात.दिवे गावाजवळील जाधववाडी येथील सातत्याने बिजली फुलांचे उत्पादन घेणारे प्रगतिशील शेतकरी दांपत्य छबनराव जाधवराव व सुनंदा जाधवराव म्हणाले, की दरवर्षी बिजली फुलांचे चांगले पैसे मिळतात. त्यामुळे प्रपंचाला हातभार लागतो. परंतु यंदा मात्र बिजली फुलांचे मळे खूप चांगले येऊनदेखील बाजारभाव कोसळल्यामुळे सगळा तोटाच झाला होता. परंतु गणेश चतुर्थीपासून बिजलीचे बाजारभाव वाढल्याने चांगले पैसे मिळतील, अशी आशा आहे.गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील फूल व्यापारी प्रदीप लोळे म्हणाले, की यंदा आवक वाढल्यामुळे बिजली फुलांचे बाजारभाव कोसळले होते. १ किलो बिजली ३० ते ४० रुपयाने कशीबशी विकली जात होती. त्यामुळे शेतकºयांना तोटा सहन करावा लागत होता. गणेश चतुर्थीपासून १ किलो बिजलीचे बाजारभाव ९० ते ११० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPuneपुणेFarmerशेतकरी