शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनाही घ्यावे वीजमीटर रिडींग : संजय ताकसांडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 17:04 IST

कंत्राटदारांमी घेतलेल्या वीजमीटर रिडींगबाबत वाढत्या तक्रारी असल्याने, त्यांच्या मीटरची फेरतपासणी होणार आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारांच्या ५ टक्के मीटरची पाहणी करण्याचे आदेशअधिकाऱ्यांना आता ग्राहकांच्या दारी जावे लागणार

पुणे : कंत्राटदारांमी घेतलेल्या वीजमीटर रिडींगबाबत वाढत्या तक्रारी असल्याने, त्यांच्या मीटरची फेरतपासणी होणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कंत्राटदारांच्या ५ टक्के वीज मीटरचे रिडींग घेण्याचे आदेश महावितरणचेपुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना आता ग्राहकांच्या दारी जावे लागणार आहे. गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’मध्ये घेण्यात आलेल्या पुणे परिमंडलाच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता सर्वश्री पंकज तगलपल्लेवार, राजेंद्र पवार, शंकर तायडे, उत्क्रांत धायगुडे, विजय भाटकर, वादिराज जहागिरदार, उपमहाव्यवस्थापक (आयटी) एकनाथ चव्हाण आणि परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंता, उपविभाग कार्यालयप्रमुख तसेच लेखा विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. पुणे व पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे गेल्या काही महिन्यांपासून थकबाकी वाढत आहे. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करावी, असे आदेशही त्यांनी या वेळी दिले.प्रादेशिक संचालक ताकसांडे म्हणाले, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या चालू महिन्याच्या वीजबिलांसोबतच मागील थकीत वीजबिलांची शंभर टक्के वसुली करण्यासाठी सुरु असलेली मोहीम आणखी कठोरपणे राबविणे आवश्यक आहे. कंत्राटदारांच्या मीटर रिडींग घेण्याच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनाही दरमहा ५ टक्के रिडींग घेतले पाहिजे. पुणे परिमंडलात नवीन वीजजोडण्यांसाठी वीजमीटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून मागणी प्रलंबित असलेल्या ग्राहकांना ताबडतोब नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही करण्याची सूचना ताकसांडे यांनी दिली. सध्या ८९ टक्के घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झालेली आहे. डिसेंबर महिन्याअखेर या संपूर्ण वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी असेही ते या वेळी म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरण