वीज वितरणचा अभियंता जाळ्यात
By Admin | Updated: January 14, 2017 03:17 IST2017-01-14T03:17:07+5:302017-01-14T03:17:07+5:30
रांजणगाव एमआयडीसी येथील लघुउद्योजकाच्या साईटवर नवीन ट्रान्सफॉर्मर व नवीन औद्योगिक वीजमीटर कनेक्शन देण्यासाठी

वीज वितरणचा अभियंता जाळ्यात
पुणे : रांजणगाव एमआयडीसी येथील लघुउद्योजकाच्या साईटवर नवीन ट्रान्सफॉर्मर व नवीन औद्योगिक वीजमीटर कनेक्शन देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वीज वितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता व खासगी व्यक्तीला सापळा रचून पकडण्यात आले़
कनिष्ठ अभियंता विकास कुमार रस्तोगी (वय ३४, रा़ रांजणगाव, ता़ शिरुर) आणि दीपक कपाजी गव्हाणे अशी त्यांची नावे आहेत़ तक्रारदार हे राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकृत ठेकेदार आहेत़ त्यांनी रांजणगाव एमआयडीसी येथील एका लघु उद्योजकाचे साईटवर नवीन ट्रान्सफॉर्मर व नवीन औद्योगिक वीज मीटर कनेक्शनसाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज केला होता़ वीज मीटर कनेक्शन देण्यासाठी त्यांच्याकडे १२ हजार रुपयांची मागणी केली होती़