शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुणे विभागातील अडीच लाख ग्राहकांची वीज गुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 12:42 IST

पुणे शहर, पिंपरी-चिचंवड येथील १८९ रोहित्रे बाधित झाली आहेत. त्यामुळे ३० हजार १४३ ग्राहकांना त्याचा फटका बसला.

ठळक मुद्देअतिवृष्टीने सेवा विस्कळीत : साडेआठ हजार रोहित्रे बाधित

पुणे : पुणे, कोल्हापूर आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने घातलेल्या थैमानामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणच्या तब्बल साडेआठ हजार रोहित्रांचे नुकसान झाल्याने, सोमवारपासून विविध ठिकाणची वीज सेवा विस्कळीत झाली आहे. पुणे विभागातील तब्बल अडीच लाख ग्राहकांची बत्ती गुल झाली असून, त्यात पुणे शहर आणि ग्रामीण भागातील ६० हजार ग्राहकांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला साखळीत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तब्बल साडेपंचेचाळीस हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठचा भाग पाण्याखाली गेला होता. अनेक झोपडवस्ती आणि सोसायट्यांमधे पाणी गेल्याने १३ हजारांवर नागरिकांना स्थलांतरित करावे लागले. या पाण्याचा फटका महावितरणच्या रोहित्रांनादेखील बसला. रोहित्र पाण्याखाली गेल्याने येथील वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिचंवड येथील १८९ रोहित्रे बाधित झाली आहेत. त्यामुळे ३० हजार १४३ ग्राहकांना त्याचा फटका बसला. ग्रामीण भागातील तितक्याच ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. कोल्हापुरात आणि सांगलीलाही पुराचा फटका बसला आहे. कोल्हापुरातील पावणेचार हजार रोहित्रांचे पुराने नुकसान केले आहे. त्यामुळे एक लाखांवर ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. खालोखाल सांगलीला फटका बसला आहे. पुराच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर वीजपुरवठा कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी दिली. ......पुरामुळे बाधित रोहित्रे आणि ग्राहक जिल्हा                      रोहित्रांची संख्या    ग्राहकसंख्यापुणे, पिंपरी-चिंचवड     १८९                   ३०,१४३पुणे ग्रामीण                  २३००                ३०,२५२सातारा                         ८७३                  २४,१८६सांगली                        १०७१                  ५८,७५५कोल्हापूर                     ३७९२               १,०७,५५३सोलापूर                       २१६                   २,३३५एकूण                         ८,४४१                २,५३,२२४............. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmahavitaranमहावितरण