भविष्यात बॅलेटपेपरवर निवडणुका घ्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:14 IST2020-12-05T04:14:51+5:302020-12-05T04:14:51+5:30
दौैंड : भविष्यात होणाºया छोट्या मोठ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र कामगार सेना ...

भविष्यात बॅलेटपेपरवर निवडणुका घ्याव्यात
दौैंड : भविष्यात होणाºया छोट्या मोठ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र कामगार सेना प्रमुख अनिल साळवे, पुणे जिल्हा रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष आनंद बगाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पदवीधर आणि शिक्षक संघाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्यामुळे या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला उघडपणे राज्यात कौल दिला आहे. यापुढे देखील निवडणुका लोकशाही पद्धतीने झाल्या पाहिजेत. भविष्यातील सर्व छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरचा वापर निवडणूक आयोगाने अंमलात आणावा. निकालाला काही तास उशीर लागेल पण खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या याचा आनंद जनतेला होईल. जर भविष्यात बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या नाहीत तर रिपब्लिकन सेना आंदोलनाच्या पावित्र्यात राहिल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.