शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

काँग्रेसचा पाया उखडून टाकणारी निवडणूक

By admin | Updated: February 24, 2017 03:12 IST

गेली काही दशके महापालिकेवर अधिराज्य गाजविणाऱ्या व मागील दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत

पुणे : गेली काही दशके महापालिकेवर अधिराज्य गाजविणाऱ्या व मागील दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत भागीदारी करणाऱ्या काँग्रेसचा पाया उखडून टाकणारी ही निवडणूक ठरली आहे़ भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाणामारीत काँग्रेसला नियोजनबद्ध प्रचार करून उभारी घेण्याची चांगली संधी या निवडणुकीत होती़ पण, काही नेत्यांनी आघाडी करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये उमेदवारी निश्चित करण्यात घोळ घालण्यात आला़ एकाच जागेसाठी दोन दोन उमेदवारांना ए व बी फॉर्म देऊन गोंधळ निर्माण केला़ त्यामुळे काही जणांना पंजा हे चिन्ह मिळू शकले नाही़ शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सर्वांना बरोबर घेऊन प्रचाराचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण, इतरांची म्हणावी तेवढी साथ त्यांना मिळाली नाही़ भाजपाने ज्या पद्धतीने प्रचाराचा धुरळा उडवत केंद्रीय नेते, राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा, पत्रकार परिषदा घेऊन प्रचारात आघाडी घेतली़ काँग्रेसला मात्र तेवढा प्रभावी प्रचार करणे शक्य असूनही नियोजनाअभावी ते करू शकले नाही़ उपमहापौर मुकारी अलगुडे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांना पराभवाची चव चाखावी लागली आहे़ याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले की, हा निकाल विचार करायला लावणारा आहे़ पक्षाचे केडर, संघटना मजबूत करून नेमके कोठे चुकते, याचे आत्मपरिक्षण आम्ही करू़ लोकांचा हा निर्णय आम्हाला मान्य आहे़ असे असले तरी भाजपाने सत्ता मिळविण्यासाठी निवडलेली पद्धत अत्यंत चुकीची आहे़ त्यांनी पैशांचा, गुंडांचा तसेच पोलीस बळाचा वापर उघडपणे केला़ पदयात्रेत गुंड उघडपणे फिरत होते़ तरीही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली़ अगदी निवडणूक आयोगाच्या कामकाजातही हस्तक्षेप केला़ आम्ही हा सर्व प्रकार गांभीर्याने घेणार आहोत़ (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची की नाही, या संभ्रमात उमेदवार व कार्यकर्ते शेवटपर्यंत राहिल्याने त्याचा फायदा काँग्रेसला एक प्रभाग सोडता कोठेही झाला नाही़ एकेकाळी एकहाती सत्ता मिळविणाऱ्या काँग्रेसला यंदा कशीबशी दोन आकडी संख्या गाठता आली आहे़ तीन वर्षांपूर्वी केंद्रात व अडीच वर्र्षांपूर्वी राज्यात झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अजूनही जागी झाली नसल्याचे या निकालाने दाखवून दिले.