भांडारकर संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू
By Admin | Updated: March 23, 2017 04:33 IST2017-03-23T04:33:32+5:302017-03-23T04:33:32+5:30
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नियामक मंडळाच्या २५ जागांसाठी ही निवडणूक

भांडारकर संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू
पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नियामक मंडळाच्या २५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. नियामक मंडळाची मुदत संपुष्टात येत असल्याने कोणतेही नवे मोठे प्रकल्प किंवा धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, अशी एक अलिखित संहिता लागू झाली आहे. नवीन नियामक मंडळाने ६ जुलै रोजी कार्यभार स्वीकारल्यानंतरच नवीन उपक्रम राबविता येणार आहेत.
शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या संस्थेच्या नियामक मंडळाचा कार्यकाल यंदा संपत आहे. संस्थेच्या घटनेनुसार त्रैवार्षिक निवडणुकांनंतर नवीन नियामक मंडळ अस्तित्वात येते. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या आजीव सभासदांना मतदानाचा अधिकार मिळतो आणि त्यांच्याद्वारे नियामक मंडळाच्या सदस्यांची निवड होते.
सद्य:स्थितीत संस्थेचे २ हजार २०५ आजीव सदस्य आहेत, त्यांना मतदारयादी आणि त्यासोबत उमेदवारी अर्ज पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)