शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Pune : तब्बल १९ वर्षांनी होणार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक

By नितीन चौधरी | Updated: January 13, 2023 19:58 IST

अंतिम मतदार यादी १५ मार्चला प्रसिद्ध होऊन २९ एप्रिलला मतदान होणार...

पुणे : तब्बल १९ वर्षे प्रशासकीय कार्यकाळ असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसह राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यावरील स्थगिती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती उठविल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार अंतिम मतदार यादी १५ मार्चला प्रसिद्ध होऊन २९ एप्रिलला मतदान घेऊन निकाल ३० एप्रिलला जाहीर करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. तसेच राज्यातील निवडणुकीस पात्र २८१ बाजार समित्यांच्याही निवडणुका ३० एप्रिलपूर्वी होणार आहेत.

राज्यात अग्रगण्य असलेली आणि उत्पन्नामध्ये मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी शुक्रवारी (दि. १३) दिले. जिल्हा उपनिबंधकांनी आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार या कारणांमुळे या समितीचे २००३ मध्ये संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर तब्बल १९ वर्षे या बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळाची नियुक्ती न होता प्रशासक राज कायम राहिले. राज्यातील कोणत्याही पक्षाच्या सरकारने समितीच्या निवडणुका प्रलंबित ठेवण्याचेच धोरण अवलंबिले. आता ही प्रशासकीय राजवट संपून लोकनियुक्त संचालक मंडळ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार क्षेत्रातील बहुतांश प्राथमिक कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. त्यानुसार पुणे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरु करावी, असे आदेश प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिले आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

सदस्य सुची मागविणे : २७ जानेवारीप्रारुप मतदार यादीसाठी ही सदस्य सुची बाजार समिती सचिवांकडे सुपूर्द करणे : ३१ जानेवारी

सचिवांनी प्रारुप मतदार यादी तयार करणे : ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारीप्रारुप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे (कृषी उत्पन्न बाजार समिती) सादर करणे : १५ फेब्रुवारी,

प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी करणे : २० फेब्रुवारी,आक्षेप, हरकती मागविणे २० फेब्रुवारी ते १ मार्च २०२३

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : १५ मार्चनिवडणूक कार्यक्रम जाहीर करणे : २७ मार्च

अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस : ३ एप्रिलअर्जांची छाननी : ५ एपिल,

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस : २० एप्रिलमतदान : २९ एप्रिल

मतमोजणी : ३० एप्रिलअन्य निवडणुकाही ३० एप्रिलपूर्वीच

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ३० एप्रिलपूर्वीच घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही बाजार समित्यांच्या प्रारुप याद्या तयार नाहीत. तसेच अनेक समित्यांना निधीची अडचण आहे. यातून मार्ग काढला जाईल. आणि न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व पात्र २८१ बाजार समित्यांच्या निवडणुका ३० एप्रिलपूर्वीच घेतल्या जातील, असेही खंडागळे यांनी सांगितले.

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र