शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

पुणे जिल्ह्यात निवडणुकीचा खर्च तब्बल १०० कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 15:11 IST

सरासरी एका विधानसभेसाठी ५ कोटींचा खर्च : सर्वाधिक खर्च सोलापूर जिल्ह्यात

ठळक मुद्देप्रथमच निवडणुकीत अनेक लहान-लहान गोष्टींवर दिले विशेष लक्षप्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया, मतदान, मतमोजणीसाठी विशेष सूचनानिवडणुकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळेदेखील खर्चामध्ये वाढ प्रशासनाला मोठ्या प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपात पत्राशेड टाकून मतदान केंद्रे तयार

पुणे : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याचा निवडणूक खर्च तब्बल १०० कोटींच्या घरात केल्याचा प्राथमिक अंदाज आला आहे. यामध्ये एका विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी ५ कोटींचा खर्च झाला असून, खर्चाचा अंदाज नुकताच शासनाला सादर केला आहे. पुणे विभागामध्ये सर्वाधिक खर्च सोलापूर जिल्ह्यात झाला असून, सर्वांत कमी सांगली जिल्ह्याचा खर्च असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यावेळी प्रथमच निवडणुकीत अनेक लहान-लहान गोष्टींवर विशेष लक्ष दिले. मतदार नावनोंदणी मोहिमेपासून निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया, मतदान, मतमोजणीसाठी विशेष सूचना दिल्या होत्या. यामध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. यावरदेखील फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला. निवडणुकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळेदेखील खर्चामध्ये वाढ होत आहे. राज्यात तीन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत पुणे विभागाचा विधानसभानिहाय खर्च साडेतीन कोटींच्या घरामध्ये गेला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात साडेपाच कोटी, पुणे जिल्हा पाच कोटी व सोलापूर साडेतीन कोटी, असा सरासरी खर्च झाला असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यानुसार निधीची मागणी शासनाकडे केली आहे. दिव्यांग मतदारांसाठी भाड्याने घेतलेल्या खुर्च्या, संगणक, प्रिंटर, कॅमेरे, तसेच मतदान यंत्रांची वाहतूक, कर्मचाºयांचा भत्ता, कँटीन खर्च स्टेशनरी, वाहनांचा खर्च, मतदार याद्यांची छपाई तसेच मंडप, वीज, जेवण, चित्रीकरण, मतमोजणी व्यवस्था, स्ट्राँग रूम, बंदोबस्त यांचा यामध्ये समावेश आहे. निवडणूक खर्चासाठी विशिष्ट नियमावली नसली तरी काही निवडणूक अधिकाºयांनी प्रमाणापेक्षा जास्त खर्च केल्याचे दिसून आले आहे. निवडणूक विभागाने अंतिम खर्चाची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही; परंतु विधानसभा मतदारसंघनिहाय खर्चाचा तपशील मात्र शासनाला सादर केला आहे...........खर्चामध्ये मोठी वाढ झाल्याचे स्पष्टपुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये सरासरी ५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. यामध्ये शहरी भागातील पहिल्या, दुसऱ्या मजल्यावरील सर्व मतदान केंद्रे आयोगाच्या आदेशानुसार तळमजल्यावर घेतली. प्रशासनाला मोठ्या प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपात पत्राशेड टाकून मतदान केंद्रे तयार करावी लागली. यामुळे खर्चामध्ये मोठी वाढ झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा