आंबेगाव तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:34+5:302021-02-05T05:03:34+5:30
आंबेगाव गावठाण, थोरांदळे, गंगापूर बु., पिंपळगाव तर्फे घोडा, राजपूर, राजेवाडी, पांचाळे बु., माळीण, शिनोली, आसाणे, कोंढवळ, ढाकाळे, पोखरी, जांभोरी ...

आंबेगाव तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींची निवडणूक
आंबेगाव गावठाण, थोरांदळे, गंगापूर बु., पिंपळगाव तर्फे घोडा, राजपूर, राजेवाडी, पांचाळे बु., माळीण, शिनोली, आसाणे, कोंढवळ, ढाकाळे, पोखरी, जांभोरी व तिरपाड या आंबेगाव तालुक्यातील मुदत संपणा-या १५ ग्रामपंचायती असून नव्याने स्थापन झालेल्या वडगाव काशिंबेग, वाळुंजवाडी या दोन ग्रामपंचायती आहेत .अशा एकंदरीत १७ ग्रामपंचायतींची प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रमांतर्गत ८ फेेब्रुवारी रोजी तहसीलदारांच्या वतीने प्रत्येक गावाचे गुगल मॅप नकाशे अंतिम केले जाणार आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत तलाठी व ग्रामसेवक स्थळ पाहणी करून प्रभागाच्या सीमा निश्चिती करणार आहे. १६ फेबु्रवारी प्रारूप प्रभाग रचनेच तहसिलदारांच्या वतीने मान्यता दिली जाणार आहे. १ एप्रिल जिल्हाधिका-यांनी मान्यता दिलेल्या प्रभाग रचनेला प्रसिध्दी दिली जाणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.