शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जनतेतून निवड झालेल्या सरपंचाला अखेर घरी बसविले; पुणे जिल्ह्यातील पहिलाच निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 21:33 IST

ग्रामसभेत गुप्त मतदान घेऊन बहुमताने जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला कायमचे घरी बसविले

ठळक मुद्देतपास अधिकाऱ्याने विशेष ग्रामसभेत घेतलेल्या गुप्त मतदानानंतर अविश्वास ठराव मंजूर

पुणे : खेड तालुक्यातील शेलगाव येथील थेट जनतेमधून निवडून आलेल्या सरपंच नागेश नवनाख आवटे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या तपास अधिकाऱ्याने विशेष ग्रामसभेत गुप्त मतदान घेऊन बहुमताने जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला कायमचे घरी बसविले. पुणे जिल्ह्यात जनेतमधून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव आणून मंजूर करण्याचा हा पहिलाच निकाल झाला आहे. तकालीन भाजप सरकारने थेट जनतेमधून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुका या निर्णयानुसार झाल्या. परंतु थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच आणि अन्य ग्रामपंचायींच सदस्यांचा अनेक ठिकाणी मेळ बसत नाही. यामध्ये सरपंच एका बाजूला व संपूर्ण ग्रामपंचायत, गाव एका बाजूला यामुळे अनेक गावांचा विकास खुटला आहे. परंतु थेट लोकांमधून निवडून आलेल्या सरपंचाला घरी बसविण्यासाठी शासनाने अत्यंक कडक नियम घातले होते. यामध्ये शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनामध्ये जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर ग्रामपंचायतीच्या सदस्या मंडळातील तीन-चर्तुथाश सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला असेल, तर पुन्हा जनतेमध्ये जाऊन साध्या बहुमताने अविश्वास ठराव साठी मतदान घेतले जाते.खेड तालुक्यातील शेलगाव येथील सरपंच नागेश गावडे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्यानंतर जनतेमधून अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी खेड तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. शेलगाव मधील २२२ मतदारांनी ज्या मतदानात भाग घेतला त्यामध्ये ठरावाच्या बाजूने २०७ मते पडली. तर ठरावाच्या विरोधात ११ जणांनी मतदान केले. चार मते बाद झाली. या प्रक्रियेमध्ये थेट सरपंचाच्या विरोधात बहुमत असल्यामुळे सरपंच नागेश आवटे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला व त्यांना घरी बसविले. --आता सरपंच कसा निवडायचा जिल्हा प्रशासनाची अडचणजनतेमधून सरपंच निवड झाल्याने आणि अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे शेलगाव येथील ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त झाले आहे. या दरम्यान राज्य शासनाने जनतेमधून सरपंच निवड हा कायदा रद्द केला आहे. आता जुन्या कायद्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवड केली जाते. मात्र या ग्रामपंचायत निवडणूक जनतेमधून झाली असल्याने रिक्त जागेवर कोणत्या निवडणूक पद्धतीने सरपंच निवड करायची याबद्दलचे मार्गदर्शन शासनाकडे मागवण्यात आले आहे.

टॅग्स :Khedखेडsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार