ट्रकच्या धडकेने वृद्ध महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:08 IST2021-07-04T04:08:07+5:302021-07-04T04:08:07+5:30
फुलाबाई देवकर असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. फुलाबाई या त्याचे भाऊ भरत मालपोते यांच्याबरोबर दुचाकीवरून घराकडे जात ...

ट्रकच्या धडकेने वृद्ध महिलेचा मृत्यू
फुलाबाई देवकर असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. फुलाबाई या त्याचे भाऊ भरत मालपोते यांच्याबरोबर दुचाकीवरून घराकडे जात होत्या. यावेळी त्यांच्या घराजवळच काही फूट अंतरावर एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात फुलाबाई यांचा मृत्यू झाला तर, भरत मालपोटे हे जखमी झाले. फुलाबाई या घोटवडे गावचे शेतकरी व वारकरी हभप गोविंद देवकर यांच्या मातोश्री होत्या. पौड पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या मार्गाचे काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झाले आहे. पिरंगुट औद्योगिक परिसर व हिंजवडी, माण येथील आयटी पार्कमुळे हा मार्ग वर्दळीचा झाला आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. या मार्गावर गावे, वाड्या, शाळा असून सार्वजनिक बांधकाम खात्यांनी येथे गतिरोधक करावेत. त्यामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा येईल व अपघात टळतील, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.