वयोवृद्ध साठे दांपत्याने दाखवले पुस्तकदानातून दातृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:40+5:302021-02-05T05:20:40+5:30

सुरेश साठये, वय ८२ वर्षे व त्यांच्या पत्नी मनीषा साठ्ये, वय ७२ वर्षे हे निवृत्त दांपत्य हडपसरमधील गंगा रेसीडेन्सी ...

Elderly stock couple show charity through book donation | वयोवृद्ध साठे दांपत्याने दाखवले पुस्तकदानातून दातृत्व

वयोवृद्ध साठे दांपत्याने दाखवले पुस्तकदानातून दातृत्व

सुरेश साठये, वय ८२ वर्षे व त्यांच्या पत्नी मनीषा साठ्ये, वय ७२ वर्षे हे निवृत्त दांपत्य हडपसरमधील गंगा रेसीडेन्सी मध्ये राहतात. सुरेश साठ्ये टेलीग्राम ॲाफिसमध्ये कामाला होते, तर त्यांच्या पत्नी मनीषा शिक्षिका होत्या. ‘लोकमत’च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी नरवडे यांच्याशी संपर्क साधून ४०० पुस्तके दान केली.

प्रशांत नरवडे म्हणाले की, सोशल मीडियामध्ये गुंतून गेलेल्या तरुण पिढीला दुसऱ्या कशाचीही भ्रांत राहिली नाही. सोशल मीडियाची वाढ आणि वाचन संस्कृतीचा ऱ्हास असे चित्र आहे. सोशल मीडिया दिवसेंदिवस विक्राळ रूप धारण करत असल्याने वाचनसंस्कृती कशी टिकवायची, हा प्रश्न आहे.

फोटो ओळ : ‘लोकमत’च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनंतर साठ्ये दांपत्यांनी वंदे मातरम संघटनेचे प्रशांत नरवडे यांच्याकडे तब्बल ४०० पुस्तके दान केली.

Web Title: Elderly stock couple show charity through book donation