शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

Kasba By Election | निष्ठा काय असते ते मुक्ताताई आणि गिरीश बापटांनी दाखवलं- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 17:35 IST

शिंदे म्हणाले, आम्ही लोकांना सामोरे जाणारे आहोत...

पुणे : कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. निष्ठा काय असते ते मुक्ताताई टिळक आणि गिरीश बापट यांनी दाखवून दिले आहे. गिरीश बापट यांना आम्ही आजारी असल्यामुळे प्रचारात येऊ नका असं सांगितले पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी प्रचारात येऊन हेमंत रासणे यांना बळ दिले. मुंबईत आम्ही उमेदवाराचा भरलेला फॉर्म माघारी घेतला. पण इथं तसं घडलं नाही. विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू आहे. आमची इच्छा होती की कसब्याची निवडणूक बिनविरोध व्हावी पण मविआने ते होऊ दिलं नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्या प्रचारार्थ रोड शो केला. त्यावेळी ते बोलत होते.

पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने रोड शो काढण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली होती.

कोणताही आयोग असूदे रिझल्टला महत्त्वाचा-

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आम्ही लोकांना सामोरे जाणारे आहोत. एमपीएससीच्या आंदोलनाला जे यश आले आहे त्याचे कोणतेही श्रेय आम्हाला घ्यायचं नाही. विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे तीच सरकारची भूमिका असणार आहे. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून दाखवतो. एमपीएससीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा शब्द दिला तो आम्ही पूर्ण केला. माध्यमांशी बोलताना माझ्या तोंडून चुकून लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा शब्द वापरला गेला. कोणताही आयोग असूदे रिझल्टला महत्त्व आहे. रिझल्ट देण्याचे काम मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांनी संपूर्ण ताकद झोकून दिल्याचे चित्र आहे. राज्यातील सत्तांतरानंतर थेट मतदारांचा कौल आजमावण्यासाठीची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे कोणतीही कसर सोडायची नाही, या निर्धाराने भाजपने प्रचार यंत्रणा आखली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे प्रचारात सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेMukta Tilakमुक्ता टिळकgirish bapatगिरीष बापटkasba-peth-acकसबा पेठMahavikas Aghadiमहाविकास आघाडी