शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

एकनाथ खडसेंना क्लीन चिट, भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 6:06 AM

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना, भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना, भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला आहे. या निर्णयामुळे खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश दयाराम चौधरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी, २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसीतील जमीन मूळ जमीनमालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. जमिनीची किंमत सुमारे ३१ कोटी ११ लाख रुपये असताना, ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून, भोसरी येथील करोडो रुपयांची जमीन खरेदी करण्यात आली. त्यामुळे या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने, राज्य सरकारने चौकशीची घोषणा केली. पुढे याच आरोपांमुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणाची पुण्यातील एसीबीकडून चौकशी सुरू होती. एसीबीने पुण्यातील न्यायालयात आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात खडसेंना क्लीन चिट देण्यात आल्याचे समजते. भोसरी येथील भूखंड खरेदी करताना खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही. शिवाय या भूखंड खरेदीमुळे शासनाचा महसूल बुडालेला नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.खोटे आरोप करणारे तोंडघशी पडलेदोन वर्षांच्या सखोल चौकशीनंतर आज सत्य बाहेर आले, याचा आनंद आहे. माझ्यावर खोटे आरोप करणारे आज तोंडघशी पडले आहेत. ही दोन वर्षे मला आणि माझ्या कुटुंबीयांना अस्वस्थ करणारी होती. दोन वर्षांत बरेच अनुभव आले. ४० वर्षे एका विचाराने चालत होतो. मी कोणतीही चूक केली नव्हती. त्यामुळे निर्दोष सुटणार, असा विश्वास होता. कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. फक्त सुपारीबहाद्दर आणि कथित समाजसेवक माझ्या राजीनाम्याची मागणी करायचे. मी नैतिक जबाबदारी म्हणूनराजीनामादिला होता. दरवेळी मंत्रिमंडळ विस्तार आला की, माझ्यावर आरोप केले जायचे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. दोषी असेन तर फाशी द्या, पण निर्दोष असेल, तर सत्य जनतेसमोर आले पाहिजे, असे सांगतानाच रामायणात सीतेलाही अग्निदिव्यातून जावे लागले होते, असे खडसे यांनी नमूद केले.उच्च न्यायालयात दादमागणार - अंजली दमानियासामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. एकनाथ खडसे यांना मिळालेली क्लीन चिट म्हणजे भाजपा, आपल्या पक्षातील भ्रष्ट मंत्र्यांना कशा प्रकारे वाचविते याचे उदाहरण आहे. खडसेंच्या विरोधात सर्व पुरावे असताना, त्यांना क्लीन चिट कशी मिळू शकते, असा सवालही दमानिया यांनी केला आहे. गेल्या वर्षी आॅगस्ट २०१७मध्येच मी खडसेंच्या विरोधातील सर्व पुरावे एसीबीकडे दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या सर्वांनाच क्लीन चिट देत आहेत. त्यातलाच हा प्रकार तर नाही ना, अशी शंका उपस्थित करतानाच, भाजपा सरकारच्या दबावामुळेच एकनाथ खडसे यांना एसीबीकडून क्लीन चिट देण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी टिष्ट्वटरद्वारे केला आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे