शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात शिंदे गटाचा जल्लोष अन् ठाकरे गटाचे निषेध आंदोलन

By राजू हिंगे | Updated: January 10, 2024 20:06 IST

शिंदे सरकार इथून पुढे नव्या जोमाने आणि ऊर्जेने काम करणार असल्याचे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले

पुणे : शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. या निर्णयाचे शिंदे गटाच्या शिवसेनेने पुण्यातील कार्यालया बाहेर जल्लोष केला. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी पुतळा येथे काळे झेंडे घेउन निषेध आंदोलन केले. या निकाला विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता दिली. शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरविण्याची याचिका फेटाळली असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील सारसबागेजवळील कार्यालया बाहेर जल्लोष केला.  शिवसेना जिंदाबाद , मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विजय असेा अशा घोषणा यावेळी देण्यात दिल्या.    महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दिपक मानकर आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमख  प्रमोद नाना भानगिरे यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला. 

  शिवसेनेच्या ठाकरे गटाने बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी पुतळा येथे काळे झेंडे घेउन निषेध आंदोलन केले. शिवसेना ठाकरेचीच अशा जोरदार घोेषणा दिल्या. लवादाने केला लोकशाहीचा घात आणि विधानसभा अध्यक्षाच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे, संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक विशाल धनकवडे यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. 

हा सत्याचाच विजय असून, मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी स्थापित केलेले सरकार हे कायद्याद्वारे व संविधानिक तत्वाने स्थापन झालेले सरकार आहे. न्यायदेवतेने दिलेला निकाल आम्हाला मान्य असून, नाथाळाच्या माथी मारू काठी या उक्तीप्रमाणे आजपर्यंत जे म्हणत होते की हे सरकार जास्त काळ टिकणार नाही त्यांच्या माथ्यावर आज काठी बसण्याची हीच ती वेळ. आजच्या निकालामुळे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून, शिंदे सरकार इथून पुढे नव्या जोमाने आणि ऊर्जेने काम करेल असे शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSocialसामाजिकPoliticsराजकारण