कोरेगाव भिवरला ‘एक गाव-एक गणपती’

By Admin | Updated: September 5, 2014 00:36 IST2014-09-05T00:36:47+5:302014-09-05T00:36:47+5:30

कोरेगाव भिवरला ‘एक गाव एक गणपती’ ही तीस वर्षाची परंपरा कायम आहे.

'Ek Gaav - Ek Ganapati' in Koregaon Bhivar | कोरेगाव भिवरला ‘एक गाव-एक गणपती’

कोरेगाव भिवरला ‘एक गाव-एक गणपती’

राहू : कोरेगाव भिवरला ‘एक गाव एक गणपती’ ही तीस वर्षाची परंपरा कायम आहे. या वर्षीही सार्वजनिक कामामध्ये राजकीय मतभेद, गटतट बाजूला ठेवून एकत्र येणारे गाव म्हणून राहू बेटात या गावाचा आदर्श आहे. 
1984 साली गावातील बन्सीलाल फडतरे व कांतिलाल काळे, किसन वर्पे यांनी एकत्र येऊन स्थापन केलेले हे मंडळ आजही युवा पिढीने विविध उपक्रमांनी उत्साहात चालविले आहे. शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, नवरात्रोत्सव यांसारखे उपक्रम दर वर्षीप्रमाणो साजरे केले जातात. सामाजिक बांधिलकी म्हणून स्थानिक गावांतर्गत झालेले वादही आजर्पयत या मंडळाने मिटवले आहेत. 
मंडळाच्या स्तुत्य उपक्रमामुळे त्याचा आदर्श घेऊन गावाला तंटामुक्तीचा आदर्श पुरस्कार, तसेच बन्सीलाल फडतरे यांना सरपंच असताना निर्मलग्राम पुरस्कार व आदर्श ग्राम म्हणून पुरस्कार मिळाले आहेत. 
 
कुरकुंभ : गणोशोत्सव मंडळाने यावर्षी विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. गणोशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.  येथील शिवप्रेमी मित्र मंडळ गेल्या 24 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. त्यांनी विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. नवयुग सहकार मित्र मंडळाने शिवलिंगावर स्वार झालेल्या गणोशमूर्तीचा प्रतिष्ठापना केली आहे. संघर्ष मित्र मंडळाने लक्षवेधी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. रामरहिम मित्र मंडळाने यावर्षी हत्ती आणि गरुड यावर स्वार झालेली नयनमनोहारी मूर्तीची स्थापना केली आहे, तर जय मल्हार मित्र मंडळाने यावर्षी विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. 

 

Web Title: 'Ek Gaav - Ek Ganapati' in Koregaon Bhivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.