शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलाच्या खूनप्रकरणी चाकणमधील आठ तरुणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 18:14 IST

संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात गुरुवारी एका सोळा वर्षाच्या शाळकरी मुलावर लोखंडी कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी चाकण येथील आठ तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण -  येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात गुरुवारी एका सोळा वर्षाच्या शाळकरी मुलावर लोखंडी कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी चाकण येथील आठ तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी मोबाईलवर झालेल्या शाब्दिक भांडणातून हा खून झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल ( दि. १५ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चाकण येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात हि घटना घडली. अनिकेत संदीप शिंदे ( वय १६, रा. पानसरे मळा, शिक्रापूर रोड, चाकण, ता.खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला ओंकार मनोज बिसनाळे ( वय १७, रा. पोस्ट ऑफिस शेजारी, चाकण ) याने याबाबतची फिर्याद दिली आहे. त्याच्यावर येथील येथील जयहिंद हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांनी रात्री घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. काल रात्री ११ वाजून ९ मिनिटांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी ओंकार झगडे, किरण धनवटे, तेजस रेपाळे, पप्पू धनवटे, नितीन पंचरास, वृषभ देशमुख, महिंद्र ससाणे व परेश गुंडानी ( सर्व रा. चाकण, ता.खेड, जि.पुणे ) या आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मयत अनिकेत शिंदे याने ओंकार झगडे यास मोबाईल वर कॉल करून ‘तू आम्हाला जाता येताना कुत्रा असे म्हणतो?’ असे विचारले असता झगडे याने त्यास ‘तुम्ही ऑपोझिट गॅंगचे आहात, तुम्हाला कुत्रा नाहीतर काय म्हणायचे’, असे म्हणालेने फोनवरून एकमेकांना शिवीगाळ करून त्यांच्यात शाब्दिक भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून झगडे याने गुरुवार ( दि. १५ ) रोजी रात्री साडेसातच्या सुमारास अनिकेत शिंदे यास फोन करून तुझ्या दुकानावर येतो, असे म्हणाले असता शिंदे याने त्यास किल्ल्यामध्ये बोलाविले. यावेळी फिर्यादी बीसनाळे, अनिकेत शिंदे व रामनाथ उर्फ टिल्ल्या सुखदेव घोडके हे किल्ल्यात जाऊन थांबले. यावेळी ओंकार झगडे व किरण धनवटे हे त्यांची डी ओ मोटारसायकलवरून व इतर सहाजण हातात लोखंडी कोयते व रिव्हॉल्वर अशी हत्यारे घेऊन जमावाने पायी चालत आले. यावेळी झगडे याने बिसनाळे यास बाजूला घेऊन त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केले. व किरण याने बिसनाळेच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून ट्रिगर दाबला परंतु गोळी फायर झाली नाही. यावेळी त्याच्या हातातून सुटून दोघेही मराठी शाळेच्या दिशेने पळत जात असताना अनिकेत हा ठेस लागून खाली पडला असता झगडे व किरण याने त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर इतर सहा जणांनी त्याच्या डोक्यात प, तोंडावर, गळ्यावर व मानेवर वार केले. आणि झगडे याने मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घालून खून केला. जखमी ओंकार बिस्नाळे याच्या फिर्यादीवरून काल रात्री उशिरा आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. डी वाय एस पी राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे