ट्रक नदीत पडून आठ जण जखमी

By Admin | Updated: April 24, 2016 04:32 IST2016-04-24T04:32:24+5:302016-04-24T04:32:24+5:30

खडकी येथील हॅरीस ब्रीजवरून जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कठडे तोडून नदीत पडला. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आठही जणांना सुखरुप बाहेर काढले.

Eight people injured when the truck fell into the river | ट्रक नदीत पडून आठ जण जखमी

ट्रक नदीत पडून आठ जण जखमी

पुणे : खडकी येथील हॅरीस ब्रीजवरून जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कठडे तोडून नदीत पडला. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आठही जणांना सुखरुप बाहेर काढले. शनिवारी रात्री एकच्या सुमारास अपघात झाला.
पिंपरी येथील विनायक साऊंड सर्व्हिसचा हा ट्रक असून, कार्यक्रम आटोपून आठ जण पिंपरीकडे परतत होते. दोन बंब, एक रेस्क्यू व्हॅन, एका बोटीच्या सहाय्याने २० जवान आणि रमेश गांगड, साईबाबा जिलेवार, शिवाजी चव्हाण या तीन अधिकाऱ्यांनी वीस मिनिटांतच मोहीम यशस्वी केली. नागरिकही मदतीसाठी धावून आले होते. अंधारामुळे बचावकार्यास अडथळा येत होता.

Web Title: Eight people injured when the truck fell into the river