झाड कोसळून आठ भाविक जखमी
By Admin | Updated: June 2, 2014 01:11 IST2014-06-02T01:11:11+5:302014-06-02T01:11:11+5:30
येथील ऐतिहासिक चिंच बागेतील एक जुने वाळलेले झाड कोसळून ८ भाविक जखमी झाले आहेत.

झाड कोसळून आठ भाविक जखमी
जेजुरी : येथील ऐतिहासिक चिंच बागेतील एक जुने वाळलेले झाड कोसळून ८ भाविक जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी २.३० वा, सुमारास घडली. सुदैवाने मोठी जीवित हानी झाली नाही. जखमींची नावे पुढीलप्रमाणे समीर सलीम मुजावर (वय ३२) बेलसर पोलिस पाटील), तुषार सुरेश कुदळे, वय २२ हनुमंत जगन्नाथ जगताप (वय ४०, मिलिंद महेंद्र जगताप वय २६, सर्व रा. बेलसर,ता. पुरंदर, पुणे) तसेच बंडू धोंडीबा झगडे वय (६० रा. जेजुरी ता. पुरंदर), उत्तम वसंत चव्हाण (वय ४५), योगेश उत्तम चव्हाण (वय १४) सूरज हरीदास कुचेकर (वय १५, तिघेही रा. साखरवाडी (खामगाव, ता. फलटण, जि. सातारा) हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला, हातापायांना छातीला मार लागला आहे. झाडाखाली उभ्या असणार्या तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. सर्व जखमीवर ग्रामीण रुग्णालयात, तसेच खासगी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. या बाबतीत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की येथील ऐतिहासिक चिंचबागेत गेल्या दोन महिन्यापासून राज्यभरातून कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम होत आहेत. चिंचेच्या झाडाखाली भाविक उतरून जागरण गोंधळाचे कार्यक्रम उरकत आहेत. (वार्ताहर)