शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरूंची माहिती न दिल्याने आठ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 01:09 IST

घरमालकांनी भाडेकरूंची माहिती न दिल्याने आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ​​​​​​​

नीरा - पुरंदर तालुक्यातील नीरा व परिसरातील घरमालकांनी भाडेकरूंची माहिती न दिल्याने आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.नीरा व परिसरात परप्रांतीय लोक वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाच्या पथकाने नीरा व परिसरात वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय लोकांची माहिती घेऊन हे लोक ज्या घरमालकांच्या खोलीत भाड्याने राहात आहेत, त्या घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना दिली का नाही हे तपासत होते. त्यावेळी नीरा व परिसरात आठ परप्रांतीय घरमालकांच्या खोलीत राहात असतानादेखील त्यांची माहिती नीरा पोलीस दूरक्षेत्रात दिली नसल्याचे आढळले. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाच्या पथकाने आठ घरमालकांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक संदीप कारंडे करीत आहेत.वास्तविक, घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे जरूरीचे आहे. दरम्यान, नीरा व परिसरात ज्या घरमालकांच्या खोलीत परप्रांतीय राहत असतील त्या घरमालकांनी अद्यापपर्यंत पोलिसांना माहिती दिली नाही त्यांनी तातडीने नीरा पोलिस दूरक्षेत्रात माहिती द्यावी, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने केली आहे.

टॅग्स :HomeघरCrime Newsगुन्हेगारी