पुणे: बिटकॉईनमध्ये आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून आत्तापर्यंत २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी सायबर क्राईम सेल पुणे शहरच्या पथकाने ८ जणांना अटक केली आहे. याबर सेलच्या पथकाने याप्रकरणी नागरिकांना गुंतवणुकीसाठी उद्युक्त करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश संचेती (रा. मुकुंदनगर), काजल शिंगवी (वय.२५,रा.महर्षीनगर),नरहरी व्यास (वय. ४६, रा. भवानी पेठ) हेमंत चव्हाण (रा. हडपसर),अजय जाधव (रा. काळेवाडी फाटा),हेमंत सूयर्वंशी (रा. बाणेर), पंकज आदलाखा (रा. नवी दिल्ली), हेमंत भोपे (रा.डीएसके विश्व,धायरी ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या सर्व आरोपींनी बिटकाईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुूंतकवणुक योजनेत गेन बिटकॉईन कंपनीमध्ये १ बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा ०.१ टक्के बिटकॉईन आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी २५ नागरिकांनी सदरप्रमाणे फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या सर्व फसवणुकीच्या प्रकरणात आतापर्यंत २.२५ कोटी रुपयांची फसवणुक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी आपल्या चांगल्या जनसंपर्काचा फायदा घेत विविध ठिकाणी सेमिनार घेऊन नागरिकांना बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीसाठी उद्युक्त केले.
बिटकॉईनद्वारे करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 18:17 IST
बिटकाईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुूंतकवणुक योजनेत गेन बिटकॉईन कंपनीमध्ये १ बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा ०.१ टक्के बिटकॉईन आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणुक करण्यात आली आहे.
बिटकॉईनद्वारे करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
ठळक मुद्दे२५ नागरिकांनी सदरप्रमाणे फसवणुकीची तक्रार दाखल बिटकाईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुूंतकवणुक योजना