वांग्याच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:15 IST2021-09-05T04:15:48+5:302021-09-05T04:15:48+5:30

बाजारभाव कोसळले : उत्पादन खर्चही न मिळाल्याने घेतला निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क निमगाव केतकी : तरकारी पिकातून चार ...

Eggplant | वांग्याच्या

वांग्याच्या

बाजारभाव कोसळले : उत्पादन खर्चही न मिळाल्याने घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

निमगाव केतकी : तरकारी पिकातून चार पैसे मिळतील या उद्देशाने लावलेल्या काटेरी वांग्यांना बाजारभाव नसल्याने तोडण्याची मजुरी व इतर खर्च परवडत नसल्याने हताश होऊन एकरभर शेतातील दोन हजार वांग्याची रोपे ट्रॅक्टरने जमीनदोस्त केली. सर्वच भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून आर्थिक वेढ्यात सापडले आहेत.

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील बारवकरवस्तीतील सुरेश सदाशिव बारवकर यांनी आपल्या गट नंबर १३९२ मधील एका एकरामध्ये पंचगंगा जातीची वांग्याची रोपे लावली होती. त्यासाठी बारा हजार रुपयाचा खताचा ढोस देखील दिला होता. औषध फवारणी, खते यासाठी ही जवळपास ४७ हजार असा मुबलक खर्च देखील केला. त्यातच विद्युत पुरवठा खंडित केल्याने कसेबसे पीक जगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काटेरी वांग्याला बाजार भाव मिळत नसल्याने व तोंडणीला आलेले पीक तोडून वांगी बाजारात नेण्यासाठी जो खर्च आहे. तो देखील परवडेनासा झाल्याने हतबल होऊन शेवटी त्या वांग्याच्या उभ्या पिकामध्ये त्यांनी ट्रॅक्टर फिरवून हे पीक जमीनदोस्त केले. बारवकर म्हणाले की, अत्यंत कष्टाने वांग्याचे पीक आर्थिक घडी बसवण्यासाठी मोठ्या आशेने चार पैशाचा हातभार प्रपंचाला लागेल यासाठी लावले होते. वांग्याचे पीकही जोमात उभे राहिले. मात्र, बाजार भाव नसल्याने हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत ट्रॅक्टरने जमीनदोस्त करावा लागला.

फोटो ओळी: निमगांव केतकीत वांग्याच्या पिकात ट्रक्टर फिरवताना शेतकरी सुरेश बारवकर.

०४०९२०२१-बारामती-०९

Web Title: Eggplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.