शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:22 IST

जिल्हा परिषदेतील रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरवा करण्यात येईल, तसेच जिल्हा परिषदेचे राज्य शासनाकडे असलेले थकीत विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल

पुणे - जिल्हा परिषदेतील रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरवा करण्यात येईल, तसेच जिल्हा परिषदेचे राज्य शासनाकडे असलेले थकीत विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, यासाठी योग्य प्रस्ताव देण्यात यावेत, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना व अधिका-यांना केल्या.जिल्हा परिषद कार्यालयाला गुरुवारी अजित पवार यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी पदाधिकारी आणि अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी आणि पशुसंवर्धनच्या सभापती सुजाता पवार, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने, समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे तसेच अधिकारी या वेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी विभागवार माहिती घेतली.जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाºया वैयक्तिक लाभ योजनेची माहिती घेत याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेत कर्मचाºयांची कमी असणारी संख्या तसेच निधीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी या विषयी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.जिल्हा परिषदेत नव्याने सुरु करण्यात आलेल्या सेवा हक्क कायद्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनीअजित पवार यांना विभागवार माहिती दिली.जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची भाड्यापोटी असणारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असलेली थकबाकी तसेच पाटबंधारे विभागाकडे असलेली ३६ कोटींची थकबाकीबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी पदाधिकाºयांनी पवार यांच्याकडे अनेक समस्या मांडल्या. त्या सोडविण्यासाठी योग्य प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पवार यांनी पदाधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवार