शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

वाहतूककोंडीवर प्रभावी उपाययोजना, पोलीस प्रशासनाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:35 IST

पोलीस प्रशासनाकडून पुढाकार : बेकायदेशीर वाहनांवर कडक अंमलबजावणी, रस्त्यावरील दुकानदारांना समुपदेश

राजगुरुनगर : शहरात होत असलेल्या वाहतूककोंडीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. बुधवारी (दि. १४) राजगुरुनगर नगरपरिषद व पोलीस अधिकारी यांनी कडक अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष पाहणीदौरा केला. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, मुख्याधिकारी मच्छींद्र घोलप आदी उपस्थित होते. यावेळी दुकानदारांनी रस्त्यावर लावलेले फलक जप्त करण्यात आले.

दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर, परतीच्या मार्गावर असलेल्या नोकरदार, प्रवासी यांची पुणे-नाशिक महामार्गावर रविवारपासून मोठी गर्दी झाली आहे. शहारातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. शहरातील व्यापारी, छोटे दुकानदार त्यांची पार्किंग रस्त्यात व रस्त्याजवळ असते. पर्यायाने वाहतूक सुरळीत राहण्यास अडचण येते. शहरातील वाहतुकीचे वाजलेले तीन-तेरा यामुळे शहरातील नागरिक प्रवास करणारे प्रवासी आणि पोलीस यंत्रणा हैराण झाली आहे. शहरातील अवैध वाहतूक हटवण्यासाठी पोलीस यंत्रणा आता सक्रिय झाली आहे. राजगुरुनगर ही मोठी बाजारपेठ असल्याने जवळपासच्या तालुक्यातील मोठ्या संख्येने ग्राहक सोने, कपडे आदी वस्तू खरेदीसाठी येतात. शहरात अरुंद रस्ते आणि त्यावर ग्राहकांनी केलेली पार्किंग यामुळे शहरातून जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. शहरातील रस्त्यांवर वाहने पार्किंग करू नयेत, यासाठी जनजागृती सुरू करण्यात आली आहे.४रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे या दोन्ही महामार्गांवर वाहतूक कोंडी नित्याचीच होत चालली असताना पोलीस उपविभागीय पोलीस आधिकारी गजानन टोम्पे व पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पोलीस दलाची मोठी फौज घेऊन वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.४नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात एकेरी वाहतूक, पार्किंग झोन, फलक लावून तयार करण्यात आले होते; मात्र नगरपरिषदेचे हे नियम दुकानदार व शहरातील नागरिक पायदळी तुडवत होते.४तरीही नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत असताना दिवसभर वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे त्याचा त्रास प्रत्येक नागरिकाला होत होता.४मंगळवारी (दि. १३) शहरात होणारी वाहतूककोंडी मोडून काढण्यासाठी पोलीस दल मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने वाहने रस्त्यात लावलेल्या वाहनचालकांची नागरिकांची धावपळ झाली होती.४२० ते २५ बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाला बरोबर घेऊन दुकानदारांचेसमुपदेशन करण्यात आले.व्यापाºयांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर मात्र, रस्त्यात पार्किंग करणाºया वाहनांवर थेट कारवाई केली जाणार आहे.पाहणी दौºयातूनसमोर आलेलाअ‍ॅक्शन प्लॅन४वाडा रस्त्यावरील पुरातत्त्व खात्याच्या जागेत त्यांच्या संमतीने व पंचायत समितीमागील खासगी जागेत पार्किंग झोन उभारणे.४शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत होमगार्ड नेमणूक करणे.४खासगी कंपन्या बसेससाठी मार्गदर्शक प्रणाली तयार करणे.४खेड पोलीस ठाण्याने सर्व्हे करून बनविलेला सीसीटीव्ही व पब्लिक आॅडिओ प्रस्ताव नगरपरिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंजूर करून घेणे.४आवश्यक ठिकाणी ‘पे अँड पार्क’ योजना राबविणे.४फ्लेक्स दुकानदार व होर्र्डिंग मालक यांची संयुक्त बैठक घेऊन अनधिकृत फलकांवर कारवाई केली जाणार आहे.४आपत्कालीन स्थितीत गल्ली-बोळांतून मार्ग काढण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविणे. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी