वक्तृत्वावर संस्कारांचा प्रभाव
By Admin | Updated: March 5, 2015 00:35 IST2015-03-05T00:35:54+5:302015-03-05T00:35:54+5:30
माझ्या वक्तृत्वावर वडिलांच्या वक्तृत्वाचा प्रभाव आहे. वक्तृत्व ही कला अवगत होण्यामध्ये संस्कारांचा वाटा मोठा असतो.

वक्तृत्वावर संस्कारांचा प्रभाव
पुणे : माझ्या वक्तृत्वावर वडिलांच्या वक्तृत्वाचा प्रभाव आहे. वक्तृत्व ही कला अवगत होण्यामध्ये संस्कारांचा वाटा मोठा असतो. वक्तृत्व कला हा एक संस्कार असून, हा संस्कार पिढ्या न् पिढ्या पाझरत येत असतो, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाहीर व्याख्यानांच्या उपक्रमाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सह्याद्री प्रकाशनातर्फे पुरंदरे यांचा नुकताच विशेष सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
सह्याद्री प्रकाशनाच्या जडण-घडण या शैक्षणिक मासिकाच्या दशकपूर्तीनिमित्त ‘दशकपूर्ती जडण-घडणची...मैफल वक्तृत्वाची’ हा विशेष कार्यक्रमदेखील घेण्यात आला. या वेळी पुरंदरे यांच्या गौरवार्थ देण्यात येणारा पहिला ‘जडण-घडण सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार’ माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत, डॉ. सागर देशपांडे आदी उपस्थित होते.
डॉ. भटकर म्हणाले, ‘‘शिक्षण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून त्यातून आपल्याला ‘स्व’ची ओळख होत असते. म्हणूनच शिक्षणाला महत्त्व आहे.’’ (प्रतिनिधी)