सह्याद्रीवर सोमवारपासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST2021-03-15T04:12:00+5:302021-03-15T04:12:00+5:30

कोरोनाकाळात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवरून शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘टिलीमिली’ हा कार्यक्रम प्रसारित केला. तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, ...

Educational program for 10th-12th class students on Sahyadri from Monday | सह्याद्रीवर सोमवारपासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम

सह्याद्रीवर सोमवारपासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम

कोरोनाकाळात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवरून शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘टिलीमिली’ हा कार्यक्रम प्रसारित केला. तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे इंग्रजी गणितासह भाषा विषयांबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम सह्याद्रीवरून प्रसारित केले जात आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दहावी-बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले. परंतु, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे जिल्ह्यासह राज्यातील आणखी काही जिल्ह्यांतील प्रत्यक्ष वर्ग पुन्हा बंद झाले आहेत. त्यामुळे सह्याद्रीवरून कार्यक्रम प्रसारित केले जात आहे.

----

प्रत्येक सोमवारी असे होणार प्रसारण

सह्याद्री वाहिनीवरून प्रत्येक सोमवारी दुपारी १२.३० ते १ या वेळेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. तसेच मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत दहावीसाठी १२.३० ते १ आणि १.३० ते २ या कालावधीत तर बारावीसाठी २.३० ते ३.३० या वेळेत कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत.

Web Title: Educational program for 10th-12th class students on Sahyadri from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.