शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण हक्कापासून दूर ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 11:12 IST

शिक्षण हक्कापासून दूर ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आश्वासन

ठळक मुद्देशुल्क भरण्यासाठी दबाव आणणे व शाळेतून काढून टाकणे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी दिले आहेत

मुंबई : कोरोनाच्या काळात अनेक पालकांच्या नोकरी, व्यवसायात बाधा निर्माण झाली असून, आर्थिक समस्यांमुळे पालकांना आपल्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे काही पालकांनी शाळेचे शुल्क भरले नाही. अशा विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक संस्थेने शिक्षणापासून वंचित ठेवले आहे, ऑनलाईन वर्गात प्रवेश दिला नाही, असे प्रकार समोर येत आहेत. अशा मुजोर शाळांना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

शिक्षण संस्थाना व व्यवस्थापकांना कोणत्याही विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून दूर ठेवता येणार नाही. शुल्क भरण्यासाठी दबाव आणणे व शाळेतून काढून टाकणे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी दिले आहेत. कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये राज्यातील शैक्षणिक संस्था बंद आहेत. अशा परिस्थितीतही शाळा पालकांकडून वापरात नसलेल्या सुविधा आणि इतर खर्च कमी न करता संपूर्ण शुल्क वसुली करत आहेत. मात्र, आर्थिक अडचणींमुळे अनेक पालकांना शाळांचे, शैक्षणिक संस्थांचे शुल्क एकरकमी आणि एकाच वेळी भरणे शक्य होत नाही. मात्र, नवीन शैक्षणिक वर्षाची कारणे देत अनेक शैक्षणिक संस्था पालकांना मागील वर्षाचे शुल्क पूर्ण करण्यासाठी तगादा लावत आहेत. तसे न केल्यास नवीन ऑनलाईन वर्गांना विद्यार्थ्यांना बसू दिले जात नाही. अनेकांना त्यांचे शाळा सोडल्याचे दाखले दिले जात आहेत. यासंदर्भात अनेक पालक आंदोलने करत आहेत. तक्रारी घेऊन विद्यार्थी आणि पालक संघटनांकडे आपली निवेदने देत आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी संघटनांनीही शिक्षणमंत्र्यांना यासंदर्भात कारवाईची मागणी केली होती.

...म्हणून पालक वर्गातून उमटल्या संतप्त प्रतिक्रियाशैक्षणिक संस्थांकडून शुल्क कपात न होता उलट शुल्कासाठी पालकांची पिळवणूक होत आहे. मात्र, यासंदर्भात पालकांनी वारंवार तक्रारी करूनही शिक्षण विभागाकडून मात्र त्यासंदर्भात काहीच कारवाई होत नाही. शिक्षणमंत्री केवळ आश्वासन देतात. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत एकाही शाळेवर प्रत्यक्षात कारवाई झालेली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया पालक वर्गातून उमटत आहे. शाळा शुल्कासंदर्भात प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत शिक्षण विभागाकडून त्यावरील कारवाईची टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी पालक संघटना करत आहेत.

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाडPuneपुणेEducation Sectorशिक्षण क्षेत्र